मैल खड्यास आगीचा ‘आप’ कडून निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैल खड्यास आगीचा ‘आप’ कडून निषेध
मैल खड्यास आगीचा ‘आप’ कडून निषेध

मैल खड्यास आगीचा ‘आप’ कडून निषेध

sakal_logo
By

63945
--------
मैल खड्यास आगीचा
‘आप’कडून निषेध
ठोस कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा
इचलकरंजी, ता. २२ : मैल खड्यास वारंवार लागणाऱ्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना जगणे मुश्कील बनले आहे. आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. वारंवार तक्रार करूनही महानगरपालिकेकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने मंगळवारी आम आदमी पक्षातर्फे निषेध केला. ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
शहरातील सांगली नाका परिसर येथे असणाऱ्या कचरा डेपोला पुन्हा आग लागली आहे. येथील सांगली नाका, शिक्षक कॉलनी, आसरानगर, वृंदावन कॉलनी, सुरभी कॉलनी, निशिगंध हौसिंग सोसायटी व परिसरात धुराचे साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे येथील स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत आम आदमी पक्षातर्फे मैल खड्यासमोर निषेध केला.