इचलकरंजीकरांना दोन दिवस आड पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीकरांना दोन दिवस आड पाणी
इचलकरंजीकरांना दोन दिवस आड पाणी

इचलकरंजीकरांना दोन दिवस आड पाणी

sakal_logo
By

इचलकरंजीकरांना
ोदोन दिवस आड पाणी
इचलकरंजी, ता.२२ : शहरात पुन्हा एकदा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालवली आहे. तसेच पाण्याला उग्र वास येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इचलकरंजी महापालिकेने पंचगंगा नदीतून करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. त्यामुळे शहरवासीयांना आता दोन दिवस आड पाणी मिळणार आहे.
इचलकरंजी शहराला कृष्णा नदीतून व पंचगंगा नदीतून एकत्रीत पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही दिवसांपासून पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पाणी प्रदूषणाची तीव्रता वाढत असल्याचे समोर आले आहे. पाण्याचा उग्र वास येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका पाणीपुरवठा विभागाने खबरदारी घेतली आहे. यामध्ये पंचगंगा नदीतून करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात निर्णय घेतला आहे. या योजनेतून नऊ एमएलडी इतके पाणी उपलब्ध होत होते. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा आता एक ऐवजी दोन दिवसांनी करण्यात येणार आहे. नागरिकांनीही खबरदारी म्हणून पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांनी केले आहे.