इचलकरंजी येथे रविवारी ‘गाथा शिवरायांची’ कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी येथे रविवारी
‘गाथा शिवरायांची’ कार्यक्रम
इचलकरंजी येथे रविवारी ‘गाथा शिवरायांची’ कार्यक्रम

इचलकरंजी येथे रविवारी ‘गाथा शिवरायांची’ कार्यक्रम

sakal_logo
By

इचलकरंजी येथे रविवारी
‘गाथा शिवरायांची’ कार्यक्रम
इचलकरंजी, ता. १५ : येथील मराठा मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त ‘गाथा शिवरायांची’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची यशोगाथा मांडणारा हा कार्यक्रम रविवारी (ता. १९) रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे होणार आहे.
कार्यक्रमांतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची यशोगाथा ऐतिहासिक गीतांच्या माध्यमातून मांडली जाणार आहे. अविनाश सूर्यवंशी हे या कार्यक्रमाचे निर्माते असून, इचलकरंजीचे गायक मुकुंद चौगुले प्रस्तुतकर्ते आहेत. अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था, नेत्रदीपक नेपथ्य, प्रकाश योजना असा वैशिष्टयपूर्ण हा कार्यक्रम असून, रसिक श्रोत्यांसाठी मोफत आहे.
गायक मुकुंद चौगुले, गायिका निता ठाकूर-देसाई हे स्वरसाज चढविणार असून, त्यांना सर्जेराव कांबळे व स्नेहा संकपाळ हे कोरस साथ करणार आहेत. रिदम ऋतिक कुरणे, राजू आवटे, सचिन देसाई, बासरी सचिन जगताप, हार्मनी संग्राम कांबळे, बेस गिटार महेश कांबळे यांची साथसंगत असणार आहे. सर्जेराव कांबळे हे संगीत संयोजक आहेत. निवेदक साहिल शेख आहेत. ध्वनी व्यवस्था प्रशांत होगाडे व ऋषिकेश ठाकूर-देसाई यांची आहे. प्रकाश योजना अमित ठाकूर-देसाई यांची आहे. कार्यक्रमास श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा मंडळाचे अध्यक्ष आनंद उदाळे व निर्माते सूर्यवंशी यांनी केले आहे.