कृष्णा नदीतून पाणी उपसा सुरू

कृष्णा नदीतून पाणी उपसा सुरू

कृष्णा नदीतून पाणी उपसा सुरू
इचलकरंज शहराला पाणी पुरवठा करणाऱ्‍या कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या वितरण नलिकेला लागलेली गळती काढण्याचे काम आज पूर्ण झाले. त्यामुळे सायंकाळपासून कृष्णा नदीतील पाणी उपसा करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र शहरात विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत होण्यास आणखीन दोन-तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. आठ दिवसांपासून गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे कृष्णेतून पाणी उपसा बंद होता. नविन वितरण नलिका टाकून गळती काढण्याचे काम पूर्ण झाल्याने कृष्णा नदीतून आज सायंकाळनंतर पाणी उपसा सुरू केला आहे. दरम्यान, शहराला एकदिवसआड पाणी देण्याचा प्रयत्न आणखीन दोन-चार दिवसानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com