Wed, May 31, 2023

पोलीस वृत्त
पोलीस वृत्त
Published on : 21 March 2023, 5:51 am
इचलकरंजीत दोन मोबाईल चोरट्यांना अटक
इचलकरंजी : शिवाजीनगर पोलिसांनी दोन मोबाईल चोरट्यांना अटक केली. आदनान इलाई मुजावर (वय २०, रा. दर्गाजवळ, बाजारपेठ, हातकणंगले) व मारुती भगवान कोरवी (२३, म्हैसाळ, ता. मिरज, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले. मोबाईल शॉपीमध्ये हे दोघेजण चोरीचे मोबाईल घेऊन विक्रीसाठी आले असता त्यांना पोलिसांच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीचे दोन मोबाईल मिळून आले.