योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हा
योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हा

योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हा

sakal_logo
By

01532
इचलकरंजी: घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यशाळेत आमदार राजू आवळे यांनी मार्गदर्शन केले.
----------
योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हा
प्रा. शरद गायकवाड; इचलकरंजीत सामाजिक न्याय पर्व कार्यशाळा
इचलकरंजी, ता. २७ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय खात्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घेण्यापासून अनुसूचित जातीतील घटक मागे आहेत. संबंधित घटकांनी सामाजिक न्याय खात्याच्या योजनांचा अग्रक्रमाने लाभ घेऊन सबळ व स्वावलंबी व्हावे, असे आवाहन प्रा. शरद गायकवाड यांनी केले.
येथील सामाजिक न्याय खात्यातर्फे येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात ‘सामाजिक न्याय पर्व’ कार्यशाळा झाली. त्यात मार्गदर्शन करताना प्रा. गायकवाड बोलत होते. हा उपक्रम रवी रजपूते सोशल फौंडेशनच्या सहकार्याने घेतला. आमदार राजू आवळे यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्‍घाटन झाले. अनुसूचीत जातीच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय खात्याच्या विविध योजना असल्याचे स्पष्ट केले. कार्यशाळेत समाज कल्याण नियंत्रक कल्पना पाटील, समाजकल्याण समन्वयक सचिन कांबळे, शुभम गायकवाड यांनी सामाजिक न्याय खात्याच्या विविध योजनांची माहिती दिली. महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, शहरप्रमुख भाऊसो आवळे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, कोरोचीचे सरपंच डॉ. संतोष भोरे आदी उपस्थित होते.