आयुक्त देशमुख यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्त देशमुख यांचा सत्कार
आयुक्त देशमुख यांचा सत्कार

आयुक्त देशमुख यांचा सत्कार

sakal_logo
By

01544
इचलकरंजी: माणुसकी फौंडेशनतर्फे आयुक्त सुधाकर देशमुख यांचा सत्कार केला.
---------
आयुक्त देशमुख यांचा सत्कार
इचलकरंजी : प्रशासकीय कामकाजातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यात ‘ड’ वर्ग महापालिकांमध्ये इचलकरंजी महानगरपालिका अव्वल ठरली. याबद्दल माणुसकी फौंडेशनतर्फे आयुक्त सुधाकर देशमुख यांचा नुकताच सत्कार केला. राज्याच्या नगर विकास विभागाने राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिका यांचे पाच गटात विभाजन करुन मुल्यांकन केले होते. ‘ड’ वर्ग महापालिकांच्या गटात इचलकरंजी महापालिका अव्वल ठरली आहे. शासनाच्या विविध योजनांसह प्रभावी करवसुलीची उत्कृष्ठ कामकाज केल्याबद्दल शासनातर्फे नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते गौरव केला. यावेळी कृष्णा इंगळे, रमाकांत साळी, मच्छिंद्र मोरे, निकेतन कांबळे, संकेत कांबळे, रंकीत रॉय, तुषार आवळे, आनंदा इंगवले, वंश मिणेकर उपस्थित होते.