नॅचरल गॅस गळती होवून आग

नॅचरल गॅस गळती होवून आग

01549, 01550

इचलकरंजी ः गॅस लाइन लीकेज होऊन आगीच्या ज्वाळा उसळल्या होत्या. दुसऱ्या छायाचित्रात आगीत दुचाकी खाक झाली.
....

इचलकरंजीत नॅचरल गॅस गळतीने आग
---
दुचाकी जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही, अर्ध्या तासाने आग आटोक्यात
इचलकरंजी, ता. ६ ः शहरात नॅचरल गॅसपुरवठा करणाऱ्या‍ पाइपलाईनच्या व्हॉल्व्हला लागलेल्या गळतीमुळे मोठी आग लागली. त्यामुळे शहरात घबराटीचे वातावरण पसरून मोठी खळबळ उडाली. रात्री साडेतीनच्या सुमारास लागलेल्या या आगीत एक दुचाकी खाक झाली; तर शेजारी असलेल्या झाडानेही पेट घेतला. या आगीच्या झळा जवळपास २० ते २५ फूट उंच होत्या. महापालिकेच्या अग्निशामक दलाने अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नाने आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एलपीजी गॅस टाकीचे दर गगनाला भिडले आहेत. त्याला पर्याय म्हणून शहराच्या विविध भागांत नॅचरल पाइपलाईन योजना राबविण्यात आली आहे. या योजनेद्वारे घरगुती व औद्योगिक वापरासाठी गॅसपुरवठा करण्यात आला. नॅचरल गॅस कनेक्शन योजनेतून शहरात सुमारे ६९७ ग्राहक आहेत. गॅसपुरवठा होणाऱ्या‍ पाईपला गळती लागल्यास चेंबरमधील व्हॉल्व्हच्या माध्यमातून गॅसपुरवठा नियंत्रित करण्यात येतो. मात्र, व्हॉल्व्हमधूनच गॅस गळती झाल्याने नागरिकांमधून उलटसुलट चर्चा सुरू आहे.
शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास पंचवटी चित्रपटगृह परिसरातील लायकर यांच्या घरासमोर असलेल्या गॅस पाइपलाईन व्हॉल्व्हमधून अचानक गॅस गळती होऊन आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमुळे व्हॉल्व्हशेजारी असणाऱ्या‍ झाडाने पेट घेतला. वीस ते पंचवीस फूट उंच आगीच्या ज्वाळा उसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या आगीत शेजारी लावण्यात आलेली दुचाकी खाक झाली. आगीची माहिती कळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, परिसरातील वीजपुरवठा खंडित केल्याने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी आग्निशामक दलाला कसरत करावी लागली. घटनास्थळाच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती संबंधित गॅसपुरवठा करणाऱ्या‍ कंपनीला दिल्यावर जवळपास अर्ध्या तासाने गॅसपुरवठा खंडित करण्यात आला.
...
चेंबरमधील व्हॉल्व्हलाच गळती
शहराला नॅचरल गॅसपुरवठा करण्यासाठी जमिनीखालून पाइपलाइनचे जाळे विणले आहे. सुमारे १०० मीटरच्या अंतराने गॅसपुरवठा नियंत्रित करण्यासाठी चेंबर उभे करण्यात आले आहेत. एखादी पाईप लीकेज झाली; तर या व्हॉल्व्हच्या माध्यमातून तेथील गॅसपुरवठा खंडित करता येतो. मात्र, या व्हॉल्व्हमधूनच गॅस गळती झाल्याने सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गॅस गळती होऊन सुमारे १५ मिनिटे आगीच्या ज्वाळा उसळत होत्या. महापालिकेच्या अग्निशामक दलाने येऊन आग आटोक्यात आणली. मात्र, त्यानंतरही सुमारे २० मिनिटे गॅस गळती सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com