Tue, Sept 26, 2023

इचलकरंजी-शिर्डी बस सेवा सुरू
इचलकरंजी-शिर्डी बस सेवा सुरू
Published on : 10 May 2023, 4:00 am
इचलकरंजी-शिर्डी
बस सेवा सुरू
इचलकरंजी ः येथील बसस्थानकातून इचलकरंजी शिर्डी बससेवा उद्या (ता.११) सायंकाळी सहा वाजता सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख सागर पाटील यांनी दिली. शिर्डीहून शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजता कोल्हापूर मार्गे बस इचलकरंजीमध्ये येणार आहे. इचलकरंजी शहरातून शिर्डीला जाणारा प्रवाशांची संख्या अधिक असल्याने ही सेवा सुरू केली आहे. शहर परिसरातील नागरिकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.