
शाळेचे नुकसान
01556
इचलकरंजी: मनपाच्या महात्मा गांधी विद्यामंदिर क्रमांक १८ च्या ग्रीलच्या दरवाजाचे केलेले नुकसान.
...
इचलकरंजीत मनपाच्या
शाळेतील साहित्याची नासधूस
इचलकरंजी, ता.१२: येथील मनपाच्या महात्मा गांधी विद्यामंदिर क्रमांक १८ या शाळेमध्ये साहित्याची नासधूस केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरवाजाच्या ग्रीलची मोडतोड करण्यात आली असून वर्ग खोल्यांच्या दरवाजांचे नुकसान केले आहे. हाकेच्या अंतरावरच शिवाजीनगर पोलिस ठाणे आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर केवळ समाज माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला. तर याबाबतची कोणतीच तक्रार पोलिसांत दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले.
सध्या शाळांना उन्हाळी सुटी लागली आहे. त्यामुळे बहुतांशी शाळांमधील वर्दळ थांबली आहे. परिणामी, अशा शाळांच्या इमारतींमध्ये गैर प्रकारांना वाव मिळत आहे. बहुतांशी इमारतींच्या ठिकाणी रखवालदार नाहीत. त्यामुळे या शाळा इमारतींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गांधी विद्यामंदिर हे वर्दळीच्या मार्गावरच आहे. या शाळेच्या ग्रीलच्या दरवाजाची मोडतोड केली आहे. वर्ग खोल्यांना कुलूपे लावली आहेत. असे असताना या वर्ग खोल्यांच्या दरवाजांची मोडतोड केली आहे. नेमका हा प्रकार करण्यामागचे कारण समोर आलेले नाही.