कोरोचीत घराचे कुलूप तोडून एक लाख 19 हजार रुपयाची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोचीत घराचे कुलूप तोडून एक लाख 19 हजार रुपयाची चोरी
कोरोचीत घराचे कुलूप तोडून एक लाख 19 हजार रुपयाची चोरी

कोरोचीत घराचे कुलूप तोडून एक लाख 19 हजार रुपयाची चोरी

sakal_logo
By

कोरोचीत घराचे कुलूप तोडून
सव्वा लाखाची चोरी

इचलकरंजी, ता: २२ः कोरोची (ता. हातकणंगले) येथे घराचे कुलूप तोडून चोरट्याने सव्वा तोळे सोन्या -चांदीचे दागिने व रोख ६५ हजार रुपये असा एकूण एक लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबतची तक्रार रवींद्र मारुती कांबळे (वय ४९ रा. इंदिरानगर , कोरोची) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी ,रवींद्र कांबळे हे आपल्या कुटुंबीयांसोबत बाहेरगावी गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्याने कांबळे यांचे घराचे कुलूप तोडून लाकडी कपाटातील सुमारे ४० हजार रुपयांचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, सुमारे नऊ हजार रुपयांचे तीन ग्रॅम वजनाचे मनी व लॉकेट, चांदीचे पैंजण व रोख ६५ हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.