
राष्ट्रीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेसाठी सेजल वरदाईची निवड
01610
सेजल वरदाई
योगासन स्पर्धेसाठी
सेजल वरदाईची निवड
इचलकरंजी : राज्य शालेय योगासन क्रीडा स्पर्धेचे पेठवडगाव येथे आयोजन केले होते. यामध्ये १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. मुलींच्या गटामध्ये सेजल वरदाई हिने वैयक्तिक योगासन प्रकारामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेसाठी निवड केली आहे. विद्यार्थ्यांना क्रीडाप्रमुख व्ही. एस. गुरव, क्रीडाशिक्षक डी. वाय. कांबळे, बी. एम. थोरवत, सुहास पवळे यांचे मार्गदर्शन लाभले.
----------
खालसा गुडवळेतील डीपी धोकादायक
चंदगड ः खालसा गुडवळे (ता. चंदगड) येथील गट क्रमांक १८८ मधील वीज वितरण कंपनीचा डीपी धोकादायक स्थितीत आहे. तेथे विजेच्या तारा लोंबकळत असून सतत स्पार्किंग होत असते. येथे मुले खेळतात. गुरे चरण्यासाठी सोडली जातात. त्यांच्या जीविताला धोका आहे. वीज वितरण कंपनीने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी संभाजी बोर्डे, रामजी कांबळे यांनी केली आहे. कंपनीच्या येथील अभियंत्यांना याबाबत निवेदन दिले आहे.