
साहित्य रस्त्यावर ४७ जणांना दंड
साहित्य रस्त्यावर
४७ जणांना दंड
इचलकरंजी : इमारत बांधकामाचे साहित्य रस्त्यावर ठेवल्याबाबत मनपा प्रशासनाने ४७ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल २३ हजार ५०० रुपये दंडाची रक्कम महापालिका तिजोरीत जमा झाली आहे. शहरातील विविध भागात दोन दिवस महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई केली. मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षक तसेच क्षेत्रीय अधिकारी यांनी पाहणी करून दोन दिवसांत ४७ जणांवर दंडात्मक कारवाई केली. प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे तब्बल २३ हजार ५०० इतक्या दंडाची वसुली केली. दरम्यान, संबंधितांना बांधकाम साहित्य आपापल्या खासगी जागेत हलवण्याबाबत सूचनाही दिल्या आहेत. अन्यथा फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. स्वतः आयुक्त फिरती करून या कारवाईचा आढावा घेणार आहेत.