इस्लामपूर : व्हॉलीबॉल स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इस्लामपूर : व्हॉलीबॉल स्पर्धा
इस्लामपूर : व्हॉलीबॉल स्पर्धा

इस्लामपूर : व्हॉलीबॉल स्पर्धा

sakal_logo
By

08064, 08065
इस्लामपूर : येथील २४ व्या यूथ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने गत विजेत्या बलाढ्य पश्चिम बंगालला आस्मान दाखविले. या सामन्यातील क्षण.

08066
इस्लामपूर : महाराष्ट्र मुलांच्या संघाने तुल्यबळ तामिळनाडू संघाशी कडवी झुंज दिली. या सामन्यातील क्षण.

आज रंगणार अंतिम सामने

पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, केरळ, गुजरात, चंदीगड संघांची मुसंडी

इस्लामपूर, ता. १४ : येथील लोकनेते राजारामबापू पाटील क्रीडानगरीत सुरू असलेल्या २४ व्या युथ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या पंजाब, राजस्थान, दिल्ली व हरियाणा; तर मुलींच्या केरळ, हरियाणा, गुजरात व चंदीगड या संघांनी जोरदार मुसंडी मारली आहे. आता या संघांमधूनच स्पर्धेचा विजेता ठरणार आहे. जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पर्धेस भेट देऊन खेळाचा आनंद घेत खेळाडूंचे कौतुक केले.
उपांत्य पूर्व फेरीमध्ये मुलांच्या राजस्थान विरुद्ध उत्तर प्रदेश या संघांच्यामध्ये निकराची झुंज झाली; मात्र राजस्थानने ३-२ फरकाने उत्तर प्रदेश संघावर विजय मिळविला. पंजाब संघाने तामिळनाडू आणि हरियाणा संघाने केरळ या संघावर ३-१ अशा सेटच्या फरकाने मात दिली. दिल्लीने मात्र सरळ ३ सेटमध्यो आंध्र प्रदेशला पराभूत केले. उपांत्य पूर्व सामन्यात मुलींच्या चंदीगड संघाने महाराष्ट्र संघास; तर गुजरात संघाने राजस्थान संघास ३-१ अशा फरकाने मात दिली. मात्र केरळ संघाने आंध्रप्रदेश संघाला आणि हरियाणा संघाने पश्चिम बंगाल संघास सरळ ३ सेटनी आस्मान दाखविले.
उपांत्य फेरीत मुलांचा पंजाब संघ राजस्थानशी आणि दिल्ली संघ हरियाणाशी; तर मुलींचा चंदीगड संघ गुजरातशी आणि हरियाणा संघ केरळशी भिडणार आहे. तत्पूर्वी साखळी सामन्यात मुलींच्या महाराष्ट्र संघाने गतविजेत्या बलाढ्य पश्चिम बंगाल संघास पराभूत केले. महाराष्ट्र संघाने सलग २ सेट घेतले; मात्र तिसरा सेट पश्चिम बंगालने घेतल्याने सामन्यात मोठी चुरस निर्माण झाली होती. महाराष्ट्र संघाने चौथा सेट जिंकून उपस्थित हजारो क्रीडा रसिकांची शाबासकी मिळविली. मुलांच्या महाराष्ट्र संघाचा तुल्यबळ तामिळनाडू संघाशी जोरदार मुकाबला झाला. पहिले २ सेट महाराष्ट्र संघाने घेतले; तर त्यानंतरचे २ सेट तामिळनाडू संघाने जिंकले. अंतिम ५ व्या सेटमध्ये दोन्ही संघ अगदी बरोबरीत चालले होते. मात्र केवळ १ गुणाने महाराष्ट्र पराभूत झाला.
साखळी सामन्यात मुलींच्या पश्चिम बंगाल संघाने ३ सेटनी पंजाब संघास, झारखंड संघाने ३-१ नी उत्तराखंड संघास,तामिळनाडू संघाने ३ सेटनी ओरिसा संघास, गुजरात संघाने सरळ ३ सेटनी तेलंगणा संघास, राजस्थान संघाने सरळ ३ सेटनी मध्यप्रदेश संघास, केरळ संघाने सरळ ३ सेटनी दिल्ली संघास, महाराष्ट्र संघाने सरळ ३ सेटनी उत्तराखंड संघास; तर उत्तर प्रदेश संघाने ३-१ सेटनी कर्नाटक संघास पराभूत केले. हरियाणा संघास पुढे वाटचाल मिळाली आहे.
मुलांच्या साखळी सामन्यात उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेश, तसेच झारखंड व मध्य प्रदेश या संघांमध्ये जोरदार घमासान झाले; मात्र उत्तर प्रदेश व झारखंडने सामना ३-२ अशा फरकाने जिंकला. गुजरात संघाने पांडीचेरी संघास, हरियाणा संघाने उत्तराखंड संघास, आंध्र प्रदेश संघाने कर्नाटक संघास ३-१ अशा फरकाने पराभूत केले. तसेच राजस्थान संघाने तेलंगणा संघावर, उत्तर प्रदेश संघाने ओरिसा संघावर, राजस्थान संघाने बिहार संघावर, दिल्ली संघाने तेलंगणा संघावर, केरळ संघाने चंदीगड संघावर व पंजाब संघाने पश्चिम बंगाल संघावर सरळ ३ सेटनी विजय मिळविला आहे.

चौकट :
आज रात्री तीन युवा मंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण
राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याहस्ते आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. रविवारी पहिला, दुसरा व तिसऱ्या विजेत्यापदासाठी लढती होणार असल्याने एकच मैदान केले आहे. रविवारी सकाळी कांस्यपदासाठी; तर सायंकाळी सुवर्ण व रौप्यपदासाठी लढती होतील.

Web Title: Todays Latest Marathi News Is322b05276 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top