
इस्लामपूर : व्हॉलीबॉल निकाल
इस्लामपूर : येथील २४ व्या युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत कास्यपदासाठी लढणाऱ्या पंजाब व हरियाणा संघातील अटीतटीच्या लढतीतील एक क्षण.
दिल्ली, राजस्थान, केरळ, गुजरात अंतिम फेरीत
युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा ः मुलांत पंजाब, मुलींत हरियाणाला कास्यपदक
इस्लामपूर, ता. १५ : २४ व्या युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पंजाबच्या मुलांनी आणि हरियाणाच्या मुलींनी तिसरा क्रमांक (कास्यपदक) पटकाविला आहे. या स्पर्धेच्या विजेत्या पदासाठी मुलांचा दिल्ली संघ राजस्थानच्या संघाशी तर मुलींचा केरळ संघ गुजरातच्या संघाशी भिडणार आहे. गतविजेता मुलांचा हरियाणा व मुलींचा पश्चिम बंगाल हे संघ स्पर्धेबाहेर पडले आहेत. या स्पर्धेतून मुलांचा व मुलींचा भारतीय संघ निवडला जाणार आहे.
मुलांच्या पंजाब व हरियाणा संघात कास्यपदासाठी जोरदार लढत झाली. पंजाबने पहिला तर हरियाणाने दुसरा सेट घेतल्याने सामन्यात मोठी रंगत चढली होती. मात्र त्यानंतर पंजाबने सलग २ सेट घेत सामना जिंकला. मुलींच्या हरियाणा व चंदीगड या संघात कास्यपदासाठी कांटे की टक्कर झाली. पहिला सेट चंदीगडने घेतला, मात्र त्यानंतर सलग ३ सेट जिंकत हरियाणा संघाने कास्यपदकावर आपले नाव कोरले. यापूर्वीची राष्ट्रीय स्पर्धा रुद्रपूर (उत्तराखंड) येथे पार पडली असून या स्पर्धेत मुलांचा हरियाणा, तर मुलींचा पश्चिम बंगाल संघ विजेता ठरला होता. हे दोन्ही संघ स्पर्धेबाहेर गेले.
दरम्यान, उपांत्य फेरीत मुलींच्या गुजरातची चंदीगडबरोबर तुल्यबळ लढत झाली. गुजरातने पहिले २ सेट तर नंतरचे २ सेट चंदीगडने जिंकले. गुजरातने ५ वा सेट १५-१० जिंकून अंतिम फेरी गाठली. मुलींच्या केरळ हरियाणा यांच्यातील सामनाही शेवटच्या सेटपर्यंत झाला. केरळने पहिले दोन सेट जिंकले तर नंतरचे २ सेट हरियाणाने जिंकले. केरळने ५ वा सेट १५-१३ ने जिंकून अंतिम फेरी गाठली. मुलांच्या तुल्यबळ पंजाबविरुध्द राजस्थान या दोन संघात चुरशीचा सामना झाला. राजस्थानने पहिले २, तर पंजाबने नंतरचे २ सेट जिंकले. राजस्थानने ५ वा सेट १६-१४ ने जिंकून अंतिम फेरी गाठली. तर दिल्ली संघाने गतविजेत्या हरियाणा संघावर सरळ ३ सेटने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली.
मुलांच्या निवड समितीचे सदस्य डॉ. अभिमन्यू सिंग (उत्तर प्रदेश), डॉ. बिरसिंग यादव (चंदीगड), तर मुलींच्या निवड समितीचे के कृष्णप्रसाद (तेलंगणा), वैशाली फडतरे, रेल्वे (महाराष्ट्र) हे सदस्य आहेत. सध्या ४०-४० मुले-मुलींची निवड करून तीन प्रशिक्षण वर्गानंतर अंतिम संघ निवडला जाणार आहे. मुलांच्या निवड समितीचे सदस्य डॉ.अभिमन्यू सिंग (उत्तर प्रदेश), डॉ. बिरसिंग यादव (चंदीगड) तर मुलींच्या निवड समितीचे के. कृष्णप्रसाद (तेलंगणा), वैशाली फडतरे (महाराष्ट्र) हे सदस्य आहेत. सध्या ४०-४० मुले-मुलींची निवड करून तीन प्रशिक्षण वर्गानंतर अंतिम संघ निवडला जाणार आहे.
चौकट :
राबणारे शेकडो हात!
युवानेते व महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. राज्य व देशातून आलेले खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांनी नियोजनाचे तोंड भरून कौतुक केले. प्राचार्य आर. डी. सावंत, पोपट पाटील, संदीप पाटील, रमेश पाटील, राजेंद्र सातपुते, प्रकाश पाटील, अमोल खोत, एम. जे. पाटील, संजय पाटील, सदानंद पाटील, धीरज भोसले, वैभव भोसले यांच्यासह शेकडो हात गेल्या दोन- अडीच महिन्यांपासून विविध कामासाठी राबत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Is322b05282 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..