इस्लामपूर : अपघात - एक ठार, एक जखमी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इस्लामपूर : अपघात - एक ठार, एक जखमी.
इस्लामपूर : अपघात - एक ठार, एक जखमी.

इस्लामपूर : अपघात - एक ठार, एक जखमी.

sakal_logo
By

00829
अजय कांबळे


उसाच्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक
ऊसतोड मजूर ठार; एक गंभीर
---
कामेरी रस्त्यावर अपघात; मृत सातवेतील
इस्लामपूर, ता. ८ : येथील इस्लामपूर- कामेरी रस्त्यावरील कदम मळ्याजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अमित संजय कांबळे (वय २७, रा. कसबे सातवे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हा जागीच ठार झाला; तर कर्तार आबासो सकटे (२१, कसबा सातवे, ता. पन्हाळा) हा जखमी झाला. दरम्यान, अपघातातील मृत अजय हा ऊसतोड मजूर असून, गावातील टँक्टरवर तो ऊसतोडणीस जात होता.
याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनास्थळावरून मिळालेली व पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः येथील कामेरी फाट्यावरून काही अंतरावर असलेल्या कदम मळ्याजवळ ट्रॅक्टर व मोटारसायकलचा अपघात झाला. उसाने भरलेला ट्रॅक्टर कामेरीहून इस्लामपूरला निघाला होता; तर मोटारसायकल इस्लामपूरहून कामेरीस निघाली होती. कदम मळ्याजवळ अपघात होऊन दुचाकीस्वार अमित कांबळे याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला; तर दुचाकीवर मागे बसलेला कर्तार सकटे हा गंभीर जखमी झाला आहे. पुढील उपचारांसाठी कर्तार याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमित कांबळे याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. अपघाताची बातमी समजताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चौकट
लग्नानंतर चार महिन्यांतच काळाचा घाला
मृत अजय याचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या मागे आई, लहान भाऊ, बहीण असा परिवार असून, तो घरातील एकटाच कमावता होता. कमावती व्यक्ती गेल्याने सातवेसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.