
विनयभंग शिक्षा
तिळवणीच्या तरुणास विनयभंगप्रकरणी शिक्षा
इचलकरंजी : अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने एकास शिक्षा सुनावली. सूरज मिलिंद कांबळे असे त्याचे नाव आहे. दोन विविध कलमाखाली त्याला एक महिना कैद आणि १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तिळवणी (ता. हातकणंगले) येथील सूरज कांबळे याने युवतीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना ऑक्टोबर २०१७ मध्ये घडली होती. याप्रकरणी हातकणंगले पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपनिरीक्षक आर. के. रानगर यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीत पीडित युवती, तपास अधिकाऱ्यांसह सात साक्षीदारांच्या साक्ष झाल्या. याप्रकरणी सरकारी वकील हेमंत मोहिते-पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी सूरज कांबळे यास १ महिना कैद आणि १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
मणेर मळ्यातून मुद्देमाल चोरीस
गांधीनग : विठ्ठलाई कॉलनी मणेरमळा, उंचगाव (ता. करवीर) येथील सिद्धाप्पा नारायण इंगळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीतील सोने-चांदीचे दागिने असे एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इंगळे बेळगावला गेले होते. शेजाऱ्यांनी त्यांना फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले. तिजोरीतील सोन्याची अंगठी, लॉकेट, मुद्द्या, लहान मुलांच्या एक ग्रॅमच्या व मुलांच्या हातातील चांदीचे कडे असे एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. तसेच सुनील आनंदा पाटील यांच्याही घरी चोरीचा प्रयत्न झाल्याचे पाटील यांनी पोलिसांना सांगितले. सिद्धाप्पा नारायण इंगळे यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02084 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..