
क्रीडा शिबिरास सुरुवात
18959
शांतीसागर आश्रमास भेट
इचलकरंजी : श्रीमती आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयाने शांतीसागर साधक आश्रम बाहुबली,कुंभोज येथे सदिच्छा भेट दिली. मानसशास्र विभाग, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. छात्रसैनिक आणि स्वयंसेवकांनी वृद्धांशी संवाद साधत व्यथा व समस्या समजावून घेतल्या. आश्रमाच्या अध्यक्षा प्रा. कांचन कापसे यानी मनोगत व्यक्त केले. कुंथुगिरी परिसरात विद्यार्थीनींनी स्वच्छता अभियान राबविले. कॅप्टन प्रा. प्रमिला सुर्वे, प्रकल्प अधिकारी प्रा. संगीता पाटील, प्रा. सोमनाथ गायकवाड उपस्थित होते.
- - - - - -
18958
क्रीडा शिबिराचा प्रारंभ
इचलकरंजी : डिकेटीई एज्युकेशन सोसायटीतर्फे विविध खेळांच्या उन्हाळी क्रीडा शिबिरास सुरुवात झाली. यामध्ये लाठीकाठी, योगासन, मल्लखांब, स्केटिंग, कुस्ती, ज्यूदो, धनुर्विद्या, क्रिकेट या खेळाचा समावेश असणार आहे. शिबराचे उद्घाटन पालक आरती चौगुले यांनी केले. शिबीर ६ मे पर्यंत चालणार आहे. क्रीडा प्रमुख व्ही. एस. गुरव, व्ही. ए. माने, संभाजी बंडगर, कार्तिक बचाटे, संजय माने, सुहास पोवळे, अमित कुंडले, अमित भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर झाले. यासाठी प्रशासन अधिकारी जयपाल हेरलगे,सचिव डॉ. सपना आवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
- - - - - - - - -
कोळी यांचा सत्कार
इचलकरंजी : व्यंकटराव स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक डी. के. कोळी यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार केला. इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष दीपक राशिनकर, चेअरमन सुनील नवाल यांच्याहस्ते सत्कार केला. मुख्याध्यापक ए. ए. खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दादासाहेब लाड, प्रकाश चौगुले यांची उपस्थिती होती. एस. जे. जांबोणी आदींनी अनुभव व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ. पी. एम. नर्मदे यांनी केले. आभार पर्यवेक्षक एम. एस. खराडे यांनी मानले. उपमुख्याध्यापिका सौ. ए. एम. कांबळे, कार्याध्यक्षा सौ. जे. ए. कोळी आदी उपस्थित होते.
- - - - -
वधु वर मेळावा
इचलकरंजी : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून भव्य मराठा व आंतरजातीय वधु वर मेळावा झाला. मराठा मंडळ येथे झालेल्या या वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन मदन कारंडे यांनी केले. प्रास्ताविक अमोल गोरे यांनी केले. वधू-वर व त्यांचे परीजन उपस्थित होते. खासदार धैर्यशील माने, रवींद्र माने, उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार परशराम मोरे यांनी मानले.
- - - - - - - - -
व्यक्तिमत्व विकास शिबीर
इचलकरंजी : सुलतानपुरे विद्यामंदिरात उन्हाळी शिबीर झाले. वीरशैव उत्कर्ष मंडळ संचलित श्री मृगेंद्र आण्णा सुलतानपुरे प्राथमिक विद्या मंदिर, विद्यानिकेतन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, डी. एम. बिरादार बालविद्यामंदिर व राष्ट्रसेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व विकास उन्हाळी शिबीर झाले. प्रमुख पाहुणे सहायक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ व डॉ. प्रविण कोडोलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. देवमोरे यांनी केले. पाहुण्यांची ओळख रिता रॉड्रीक्स यांनी करुन दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02091 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..