करिअर म्हणून जाहीरात विश्‍वाकडे पहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करिअर म्हणून जाहीरात विश्‍वाकडे पहा
करिअर म्हणून जाहीरात विश्‍वाकडे पहा

करिअर म्हणून जाहीरात विश्‍वाकडे पहा

sakal_logo
By

18960

करिअर म्हणून जाहिरात विश्‍वाकडे पहा
डॉ. विजय माने; व्यंकटेश महाविद्यालयात क्रिएटिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट कॉम्पिटेशन
इचलकरंजी, ता. ३ : कॉमर्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील संधीकडे करिअर म्हणून पाहिले पाहिजे. आपल्या अंगी असलेल्या सर्जनशीलतेचा वापर करण्यासाठी समाजामध्ये अनेक क्षेत्रे उपलब्ध असून जाहिरात विश्व हे त्यापैकी एक आहे. वेगळ्या क्षेत्रातील करिअर हा दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थ्यांनी जाहिरात विश्वाकडे पाहावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विजय माने यांनी केले.
व्यंकटेश महाविद्यालयात कै. मदनलालजी बोहरा व कै. गीताबाई बोहरा यांच्या प्रथम स्मरणार्थ क्रिएटिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट कॉम्पिटेशन या कार्यक्रमात ते बोलत होते. महाविद्यालयात प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पर्धेत वीसहून अधिक संघांनी सहभाग घेतला होता. लेंहंगा, शूज, एनर्जी ड्रिंक, साखर, नर्सरी, परफ्युम, हॉटेल, फेसवॉश, बिस्कीट, चॉकलेट, शर्ट यासह विविध उत्पादनांवर दृक्‌श्राव्य पद्धतीने विद्यार्थ्यांनी जाहिराती बनवल्या. जाहिरातीचे शूटिंग, एडिटिंग, डबिंग व मॉडेल स्वतः विद्यार्थ्यांनी केले होते. विजेत्या संघांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र दिले. प्रथम क्रमांक बीकॉम प्रथम वर्षाच्या साक्षी बावडेकर व संघ, द्वितीय बीकॉम तृतीय वर्षातील तोहिद माणगावे व संघ आणि तृतीय क्रमांक स्वरूपा मोहिते व संघ यांना मिळाला. बीबीए विभागाच्या अनघा रावळ व संघास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
स्पर्धेसाठी टी. एच. नाईकवाडी, एस. बी. मलघान, डॉ. पी. आर. गायकवाड, सौ. एस. टी. बिरंजे, अधीक्षक अनोष गायकवाड यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन मोहिनी आंचलिया हिने केले. परीक्षक म्हणून डॉ. एस. एन. जरंडीकर, डॉ. बी. एन. कांबळे, डॉ. एस. एच. आंबवडे यांनी काम पाहिले. आभार नाईकवाडी यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02092 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top