प्राथमिक शिक्षकांना बदलीची धाकधूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राथमिक शिक्षकांना बदलीची धाकधूक
प्राथमिक शिक्षकांना बदलीची धाकधूक

प्राथमिक शिक्षकांना बदलीची धाकधूक

sakal_logo
By

03398


प्राथमिक शिक्षकांना बदलीची धाकधूक
माहिती संकलन आटोपले; ३१ मेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ६ : कोरोनामुळे दोन वर्षांत शिक्षक संवर्गामधून बदली प्रक्रिया थांबली आहे. यंदा या बदल्यांना मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे आता राज्य शासनाच्या निर्णयानंतर दहा वर्षे झालेल्या आणि एकाच शाळेवर पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बदलीचे वेध लागले आहेत. सर्व शिक्षकांची माहिती संकलित केली असून हातकणंगले तालुक्यातील सुमारे एक हजार शिक्षकांमध्ये बदलीची आतापासूनच धाकधूक सुरू झाली आहे. ३१ मेपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
मागील दोन वर्षांत शिक्षक संवर्गामधून बदली प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे आता शासनाने शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. सेवेमध्ये दहा वर्षे पूर्ण झालेल्या व शाळेवर पाच वर्षे पूर्ण झालेले शिक्षक बदलीपात्र होणार आहेत. तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली तालुक्यातील अवघड क्षेत्रातील गावांची नावे निश्चित केली आहेत. बदली प्रक्रियेकरिता तालुक्यातील सुमारे एक हजार प्राथमिक शिक्षकांची माहिती संकलित केली गेली आहे. यामधून बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना ॲप देण्यात येणार आहेत. ॲपमध्ये शिक्षकांनी स्वतःची माहिती स्वतः ऑनलाइन भरावयाची आहे. यामध्ये अवघड क्षेत्रात तीन वर्षे काम केलेल्या शिक्षकांना बदलीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
----------------
चौकट
संवर्गानुसार बदली प्रक्रिया अशी
संवर्ग एकमध्ये ५३ वर्षे पुढील, गंभीर आजारी, विधवा, परितक्त्या, कुमारी शिक्षकांचा समावेश आहे. तर संवर्ग दोनमध्ये पती, पत्नी एकत्रीकरण, संवर्ग तीनमध्ये अवघड क्षेत्रातील शिक्षक, संवर्ग-चार एकूण सेवा १० वर्षे व शाळेवर पाच वर्ष पूर्ण केलेले शिक्षक बदली पात्र असणार आहेत.
------------------
प्रस्तावांची काटेकोर तपासणी
ॲपमद्वारे शिक्षकांना बदलीचा प्रस्ताव ऑनलाइन पाठवायचा आहे. बऱ्याचदा अनेक शिक्षक अपेक्षित क्षेत्रातील शाळा मिळण्यासाठी माहिती भरतात. हे प्रमाण मागील ऑनलाइन बदल्यांच्या प्रक्रियेत ठळकपणे उमटले. त्यामुळे यंदा बदली प्रस्तावाची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. तसेच बदली प्रक्रियेत चुकीची व खोटी माहिती भरणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने सूचित केले आहे.
----------------
प्रक्रियेत कमालीची गुप्तता
गेल्या सहा वर्षांपासून बदलीची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली. तरीदेखील बदली प्रक्रियेची माहिती संकलित करण्याचे काम तालुका पातळीवर सुरू झाले की चर्चेला उधाण यायचे. आणि कोणाची कुठे बदली होणार याबाबत सहज स्पष्टता व्हायची. यंदा मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून तालुका विभागाला सक्त सूचना आहेत. याबाबत शिक्षकांनाही माहितीची चुणूक नाही. या प्रक्रियेत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02098 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top