शोभायात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शोभायात्रा
शोभायात्रा

शोभायात्रा

sakal_logo
By

फोटो ओळ -JMH22B03401
इचलकरंजी : येथील ब्राह्मण समाजाने परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली.

इचलकरंजी, ता. ४ : येथील ब्राह्मण समाजाने परशुराम जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी राजवाडा चौकाजवळील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम तर सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महिलांसाठी हळदी-कुंकु कार्यक्रम पार पडला.
येथील ब्राम्हण समाजाच्या विविध संघटना आणि संस्थांच्यावतीनं सकाळी राजवाडा चौकाजवळील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात पूजा व पवमान अभिषेक करण्यात आला. सायंकाळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत गावभागातील नरसोबा कट्टापासुन शोभायात्रेला प्रारंभ झाला. रथ आणि समाजबांधवांसह सवाद्य निघालेली ही शोभायात्रा मुख्यमार्गावरून श्री लक्ष्मी-व्यंकटेश मंदिराजवळ पोहचल्यावर सांगता झाली.  त्यानंतर परशुराम जन्मकाळ सोहळा आणि महिलांसाठी हळदी-कुंकु कार्यक्रम झाला. या सर्व कार्यक्रमास ब्राह्मण सभा, चित्पावन संघ, श्री परशुराम सेवा संस्था, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क, समर्थ नागरी सहकारी पतसंस्था या संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह ब्राह्मण समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02100 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top