
पोक्सो चार जणांवर गुन्हा
इचलकरंजीत चौघांवर
पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर आत्याचार
इचलकरंजी, ता. ४ : अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने लैंगिक अत्याचार केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी शहापूर पोलिसांत चौघांवर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला. तुषार किटे, प्रथमेश शिंदे, आदित्य फुलारे व अभी कोकणे अशी त्यांची नावे आहेत. हा प्रकार १९ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत घडला.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अल्पवयीन पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तुषारने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तुषारचे लग्न अन्य ठिकाणी ठरल्याचे समजताच मुलीने विचारणा केली. त्या वेळी त्याने प्रेमसंबंधाबाबत कोणाला न सांगण्याबाबब जीवे मारण्याची धमकी दिली. ५ मार्चला पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. याची माहिती समजताच तुषारसह त्याच्या अन्य मित्रांना पीडित मुलीला हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अर्धवट उपचार घेऊन तिला दुपारी दोनच्या सुमारास तिच्या घरी सोडून निघून गेले. याबाबतची फिर्याद पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिली. त्यानुसार वरील चौघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02101 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..