कोथिंबीर वधारली, भाज्यांही तेजीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोथिंबीर वधारली, भाज्यांही तेजीत
कोथिंबीर वधारली, भाज्यांही तेजीत

कोथिंबीर वधारली, भाज्यांही तेजीत

sakal_logo
By

03405, 03406
इचलकरंजी : १) बाजारात बेबी हापूसला मागणी वाढत आहे. २) उन्हाचा चटका पालेभाज्यांना बसू लागल्याने दर वधारले आहेत.

कोथिंबीर वधारली, भाज्यांही तेजीत
खाद्यतेलाचे दर स्थिर; वांगी, दोडक्याची आवक वाढली, बेबी हापूसला मागणी
इचलकरंजी, ता. ५ : आता उन्हाचा चटका पालेभाज्यांना बसू लागला आहे. कोथिंबीरचे दर चांगलेच वधारले असून, इतर भाज्यांची अवस्थाही तीच आहे. टोमॅटोचे दर वाढतच आहेत. वांगी, दोडक्याची आवक बाजारात वाढली आहे. तपमानात कमालीची वाढ झाल्याने नागरिकांचे पाय काकडी खरेदीकडे वळत आहेत. कमी झालेले लिंबूचे भाव या आठवड्यात पुन्हा वाढल्याने लिंबू सरबतला जादा पैसे मोजावे लागत आहेत. खाद्यतेलाचे दर स्थिर आहेत.
फळबाजारात आंब्याची आवक वाढत आहे. बेबी हापूसला मागणी वाढत आहे. कलिंगडच्या विविध प्रजाती दाखल होतच असून आता काकडी कलिंगडाची आवक मोठी होत आहे. द्राक्ष्यांची आवक थांबली असून कुठेतरी द्राक्षे विक्रीस दिसत आहेत. इतर फळांची आवक घटली असून, उन्हाळ्यात याची झळ बाजाराला बसणार आहे. लग्नाच्या मुहूर्तानुसार फुलांना मागणी आहे. त्यानुसार फुलांना भाव मिळत आहे.
प्रति किलो रुपये भाजीपाला : टोमॅटो - ४० ते ५०, दोडका - ३० ते ४०, वांगी - ५० ते ६० कारली - ३० ते ४०, ढोबळी मिरची - ४० ते ४५, मिरची - ५० ते ६०, फ्लॉवर - ३० ते ३५, कोबी - १५ ते २०, बटाटा - २० ते २५, कांदा - १५ ते २०, लसूण - ४० ते ६०, आले - ३०-३५, लिंबू - ३०० ते १००० शेकडा, गाजर - ५० ते ६०, बिन्स - ८० ते १००, भेंडी - ४० ते ५०, काकडी - २० ते ३०, गवार - ६० ते ८०, दुधी २५ ते ३०, कोथिंबीर - २५ ते ३०, मेथी - २०, पालक - १५, इतर पालेभाज्या १० रुपये पेंढी.
खाद्यतेल : शेंगतेल - १९० ते १९५, सरकी - १८० ते १८५ सोयाबीन - १८० ते १८५, सूर्यफुल - २०५ ते २१०, पामतेल - १७५ ते १८०.
फुले : केशरी व पिवळा झेंडू - ७० ते ८०, निशिगंध - १७०, गुलाब - १५० ते १८०, गलांडा - ६० ते ८०.
फळे : सफरचंद - १२० ते २५०, संत्री - १०० ते १५० मोसंबी - १२० ते १४०, डाळिंब - १२०ते १५०, चिकू - ५० ते ६०, अंजीर - १४० - १६०, पेरू - ६० ते १००, हनुमान फळ - १०० ते १२०, खजूर - १२० - १५०, पपई - ५० ते ६०, द्राक्षे - ६० ते १००, कलिंगड - २५ ते ३०, अननस ७० ते ८०, मोर आवळा - १०० ते १२०, केळी - ३० ते ४० डझन, देशी केळी ४० ते ५० डझन, किवी ६० - ७० (लहान बॉक्स), ड्रॅगन १०० - १२०, परदेशी चिंच - १४०, लेची चेरी - २५० बॉक्स.
कडधान्य : हायब्रीड ज्वारी - २५, बार्शी शाळू - २५ ते ४०, गहू - २८ ते ३६, हरभराडाळ - ६० ते ६५, तूरडाळ - ८८ ते ९५, मुगडाळ - ९२ ते ९६, मसूरडाळ - ८६ ते ८८, उडीदडाळ - ९० ते १००, हरभरा - ५० ते ५३, मूग - ८५ ते ९०, मटकी - १२० ते १३०, मसुर - ७७, फुटाणाडाळ - ७४, चवळी - ८०, हिरवा वाटाणा - ७० ते ८०. ११० ते ११०, छोला - १००.
--------------------------
चौकट
चिकनच्या दरात पुन्हा वाढ
गेल्या महिन्यात चिकनच्या दरात कमालीची वाढ झाली होती. आता पुन्हा दरात वाढ झाली आहे. उन्हामुळे विपरीत परिणाम होत असून पोल्ट्रीमध्ये पक्षी मरत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होत आहे. आवक कमी होत असून, मागणी जादा आहे. त्यामुळे चिकनचे दर वाढले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात प्रतिकिलो १५० ते १६० रुपये असणारे चिकन आता २०० ते २२० किलो झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02102 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top