
लाखोंची फसवणूक
कापड उद्योजकाला
२८ लाखांना गंडा
इचलकरंजीत प्रकार; मुंबईतील दोघांवर गुन्हा
इचलकरंजी, ता. ५ : शहरातील बड्या कापड उद्योजकाला मुंबईतील दोघा कापड व्यापाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे २८ लाख २० हजार रुपयांना गंडा घातल्याची फिर्याद कैलाशचंद्र श्रीकिशन तोतला (कापड मार्केट) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. कामिलहुसेन मुस्साद्दीक शेख (गोरेगाव मुंबई) व जुगल चंद्रकांत शाह ऊर्फ जतीन शहा (कांदिवली मुंबई) अशी व्यापाऱ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तोतला यांचा कापड मार्केटमध्ये कापडाचा तयार करण्याचा व्यवसाय आहे. मुंबईतील कामिलहुसेन शेख व जतीन शाह यांचा तोतला यांच्याशी संपर्क झाला. दोघांनी तोतला यांचा विश्वास संपादन करून उधारीवर २८ लाख २० हजारांचे कापड खरेदी केले. त्यासाठी लागणारी कागदपत्रे तोतला यांना दिली आणि व्यवहार पूर्ण केला; परंतु वारंवार पैशांची मागणी करूनही दोघांनी पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. व्यवहारातील दोघांनी दिलेली कागदपत्रेही खोटी निघाली. यानंतर तोतला यांनी येथील अप्पर जिल्हा न्यायालयात त्या दोघांच्या विरोधात तक्रार केली. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने सीआरपीसी १५६(३) प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासाच्या सूचना दिल्या. अधिक तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02106 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..