मोबाईल चोऱ्या उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल चोऱ्या उघड
मोबाईल चोऱ्या उघड

मोबाईल चोऱ्या उघड

sakal_logo
By

चोरीप्रकरणी दोघांना अटक
इचलकरंजी : मोबाईल चोरीप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. दोन मोबाईल व मोटारसायकल असा ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कुणाल सुनील भोरे (वय २३ रा. भोनेमाळ) व निखिल शंकर पाटील (१९ कबनूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. १९ फेब्रुवारीला पावलू मोती सोज यांचा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मोबाईल हिसडा मारून नेला होता. या चोरीचा तपास सुरू असताना कुणाल भोरे व त्याचा साथीदार निखिल पाटील यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सोज यांचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार निखिल पाटील याच्याकडे चौकशी केली असता बंद घरातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. दोघांकडून ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक मनोज पाटील, पोलिस नाईक सागर चौगले, अंमलदार सुनील बाईत, सतीश कुंभार, गजानन बरगालेल विजय माळवदे, प्रवीण कांबळे, अमित कांबळे, पवन गुरव यांच्या पथकाने केली.

शर्यती जिंकल्याच्या रागातून मारहाण
आजरा ः बैलगाडी शर्यती प्रतिस्पर्धी जिंकत असल्याच्या रागातून तिघांना काठी व दगडाने मारहाण केली. बुधवार (ता. ४) आजरा-महागाव रस्त्यावर मेंढोलीनजीक हा प्रकार घडला. याबाबत आयाज दरवाजकर, मज्जीद दरवाजकर यासह तीन अनोळखींविरोधात (आजरा) गुन्हा नोंद झाला. यामध्ये ओमकार पांडुरंग खवरे, रविराज प्रकाश देसाई व विशाल श्रीकांत कदम (सुलगाव, ता. आजरा) हे तिघे जखमी झाले आहेत. खवरे याने फिर्यादीत म्हटले आहे, शर्यतीत आयाज व मज्जीद दरवाजकर पहिला नंबर येण्यासाठी चढाओढ करीत होते. दरम्यान, खवरे यांची गाडीही शर्यतीमध्ये होती. दरवाजकर यांची गाडी मागे पडल्यानंतर दोघांत वाद होऊन मारामारी झाली. दरवाजकर बंधूंसह अन्य तिघांनी ओमकार, रविराज व विशाल यांना काठी व दगडाने मारहाण केली. आजरा पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02107 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top