इचलकरंजीत रविवारपासून प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत रविवारपासून प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धा
इचलकरंजीत रविवारपासून प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धा

इचलकरंजीत रविवारपासून प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धा

sakal_logo
By

इचलकरंजीत उद्यापासून
प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा
इचलकरंजी, ता. ६ : इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनतर्फे जिम्नॅशियम मैदान येथे ८ ते १५ मे २०२२ या कालावधीत इचलकरंजी प्रीमियर लीग डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रबळ खेळाडू घडवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उदय धातुंडे यांनी दिली. स्पर्धेचे दररोज यू ट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपणही केले जाणार आहे.
इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनतर्फे सातत्याने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. रविवार (ता.८) मेपासून इचलकरंजी प्रीमियर लीग डे-नाईट क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघांचा सहभाग असून त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक सामना हा आठ षटकांचा असून डे-नाईट अशा सत्रात ही स्पर्धा होत आहे. दररोज चार सामने खेळविले जाणार आहेत. स्पर्धा प्रारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आयपीएलच्या धर्तीवर स्क्रीनची तसेच थर्ड अंपायरची सुविधा या सामन्यात असणार आहे. तसेच प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची सोय करण्यात आली आहे. स्पर्धेचे दररोज यू ट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपणही केले जाणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघास ३१,००० हजार रुपये, उपविजेत्या संघास २१ हजार व तृतीय व चतुर्थ क्रमांकास ५ हजार रुपये व विजेत्या संघास आकर्षक चषक अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी विविध वैयक्तिक बक्षिसेही दिली जाणार आहेत. या स्पर्धांचा क्रिकेटप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन धातुंडे यांनी केले. या वेळी राजू आंबी, पवन कोळी, किरण कुडाळकर, स्वप्निल खरात उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02108 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top