एकपात्रीतून आईन्स्टाइन यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकपात्रीतून आईन्स्टाइन यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश
एकपात्रीतून आईन्स्टाइन यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश

एकपात्रीतून आईन्स्टाइन यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश

sakal_logo
By

लोगो : वसंत व्याख्यानमाला
03417
इचलकरंजी : वसंत व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफताना डॉ. शरद भुथाडीया यांनी आईन्स्टाईन हे सापेक्षता सांगणारा एकपात्री प्रयोग सादर केला.


एकपात्रीतून आईन्स्टाइन यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश
डॉ. शरद भुथाडीयांनी गुंफले चौथे पुष्प; आपटे वाचन मंदिरातर्फे आयोजन
इचलकरंजी, ता. ६ : आईन्स्टाइन यांच्या मानवी स्वभावाचे पैलू त्यांच्या पापुद्र्यांसह उलगडण्यात आले. या महान प्रतिभावंताचे सापेक्षता सांगणारे व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर थोरपणाने असे ठेवण्यात आले की सर्वजण हडबडून न जाता रोमांचित झाले. हलक्या फुलक्या आणि मजेदार वातावरणाला ओलांडत आईन्स्टाइन हे एकपात्री नाटक अनेकदा गंभीर झाले आणि प्रेक्षकांना भावलेही.
शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वसंत व्याख्यानमालेत चौथे पुष्प डॉ. शरद भुथाडीया (कोल्हापूर) यांनी गुंफले. डॉ. भुथाडीया यांनी आईन्स्टाईन हे सापेक्षता सांगणारा एकपात्री प्रयोग सादर केला. आपटे वाचन मंदिराच्या उपाध्यक्षा हर्षदा मराठे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय संचालक राजेंद्र घोडके यांनी करून दिला. सन्मती बँकेचे संचालक एम. के. कांबळे, डी. एम. कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. माया कुलकर्णी यांनी आभार मानले.
डॉ. भुथाडीया यांनी आईन्स्टाईन या एकपात्री नाटकातून आईन्स्टाइनच्या भूमिकेत आपल्या आयुष्यातले आतले कप्पे, आपलं अंतरंग उलगडले."आईन्स्टाइन यांच्या उक्ती आणि कृतीत इतका प्रांजळपणा आहे आणि त्यांचे शब्द इतके प्रवाही आहेत की कोणीही त्यापासून विलग होत नाही, होऊच शकत नाही. याबाबत निरागसपणे विचारलेले भाबडे प्रश्नही नाटकात आहेत. आईन्स्टाइन सर्वांना माहीत आहेत, ते त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतामुळे. न्यूटन यांचे म्हणणे होते की, गुरुत्व हे बल आहे. पण आईन्स्टाइन यांचे असे म्हणणे होते की गुरुत्व हे क्षेत्र आहे. हे सिद्ध करण्यासाठी भर नाटकात प्रेक्षकांतून दोघांना जवळ बोलावून प्रात्यक्षिकासह गुरुत्व हे बल नसून क्षेत्र असल्याचे सांगितले.
हलक्या फुलक्या आणि मजेदार वातावरणाला ओलांडत हे नाटक अनेकदा गंभीर होत गेले. त्यात करुणेच्या छटाही दिसल्या. आपल्या कामाच्या व्यस्ततेत आकंठ बुडालेल्या आईन्स्टाइनना आपण आपली पत्नी आणि मुलाकडे लक्ष देऊ शकलो नसल्याची खंत यातून व्यक्त झाली. आईन्स्टाइन यांच्या स्टडीरूमच्या वेगवेगळ्या भागांतून आणि कोपऱ्यांतून डॉ. भुथाडीया यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत काळ आणि अवकाश यांची ज्या खुबीने ओळख करून दिली. त्यातून त्यांची दिग्दर्शकीय कल्पकता अधोरेखित झाली. प्रकाशयोजना तर फारच परिणामकारक ठरली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02109 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top