वसंत व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसंत व्याख्यानमाला
वसंत व्याख्यानमाला

वसंत व्याख्यानमाला

sakal_logo
By

वसंत व्याख्यानमाला - लोगो

03421
इचलकरंजी :आपटे वाचन मंदिराच्या वसंत व्याख्यानमालेत पाचवे पुष्प गुंफताना डॉ. पवार यांनी कॅन्सरबद्दल जाणून घेऊया'' या विषयावर मार्गदर्शन केले.

व्यसनाधीनता वाढत्या
कॅन्सरला कारणीभूत

डॉ. सूरज पवार; उपचार घेताना सकारात्मक रहा

इचलकरंजी, ता.७ : अनुवंशिकता, बदलती जीवनशैली आणि काही प्रमाणात स्त्रियांची व्यसनाधीनता वाढत्या कॅन्सरला कारणीभूत ठरत आहे. योग्य उपचाराने विविध टप्प्यांवरील कॅन्सरचे रुग्ण वेळेत बरे होतात, उपचारात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढला आहे. उपचार घेताना रुग्णांनी घाबरून न जाता सकारात्मक राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सूरज पवार यांनी व्यक्त केले. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वसंत व्याख्यानमालेत पाचवे पुष्प गुंफताना डॉ. पवार यांनी कॅन्सरबद्दल जाणून घेऊया'' या विषयावर मार्गदर्शन केले. आपटे वाचन मंदिराच्या अध्यक्षा सुषमा दातार यांनी स्वागत केले. पाहुण्यांची ओळख संचालक प्रा. मोहन पुजारी यांनी करून दिली. डॉ. बोरगावे यांनी आभार मानले. यावेळी उद्योगपती विठ्ठलराव डाके, महेश बँकेचे व्यवस्थापक श्री. बाहेती यांची उपस्थिती होती.
डॉ. पवार म्हणाले," टाटा कॅन्सर हॉस्पिटलपासून ते आजपर्यंत २२ वर्षांतील विविध टप्प्यांतील रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. इचलकरंजी व परिसरात व्यसनाधीनतेमुळे तोंडाचे कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यातील गुटखा हे महत्त्वाचे कारण आहे. स्त्रियांमधील स्तनाच्या व गर्भाशयाचा कॅन्सरदेखील अलीकडे वाढू लागले आहेत. अनुवंशिकता, जीवनशैली आणि काही प्रमाणात स्त्रियांची व्यसनाधीनता याला कारणीभूत आहे. त्वचा व ब्लड कॅन्सरही नवे नाही. योग्य उपचाराने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आठ दिवसांत रुग्ण घरी जाऊ लागले आहेत. नित्याच्या आहारात पालेभाज्या व विविध रंगांची फळे खाणे गरजेचे आहे. त्वरित कॅन्सरचे निदान होणे हे उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02111 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top