
लोकअदालत कोटींची वसुली
राष्ट्रीय लोकअदालतीत
१९६ प्रकरणे निकाली
इचलकरंजीत आयोजन; साडेतीन कोटींवर वसुली
इचलकरंजी, ता. ७ : येथील राष्ट्रीय लोकन्यायालयात आज १९६ प्रकरणे निकाली काढली. यातून साडेतीन कोटींवर वसुली करण्यात आली. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश र. ना. बावनकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले.
लोकअदालतीमध्ये महावितरण आणि बँकांची दाखलपूर्व २ हजार १२१ व न्यायालयातील प्रलंबित असलेली २ हजार ४१९ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. अशी दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित अशी १९६ प्रकरणे निकालात काढत ३ कोटी ५४ लाख ९८ हजार ७५१ रुपयांची वसुली केली. लोकन्यायालयात वकील आणि पक्षकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने जास्तीत जास्त प्रकरणे निकाली झाली. लोकअदालतीसाठी एकूण १० पॅनेल ठेवली होती. लोकन्यायालयामध्ये महावितरण, पतसंस्था, बँका, पतसंस्थांचे कर्मचारी, अधिकारी व पक्षकार यांनी सहभाग घेतला. लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी पॅनेलवर नेमलेले न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ते व न्यायालयीन कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02112 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..