
समाजवादी प्रबोधिनीत व्याख्यान
समाजवादी प्रबोधिनीत व्याख्यान
इचलकरंजी : समाजवादी प्रबोधिनीचा पंचेचाळीसावा वर्धापन दिन आणि भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष यानिमित्ताने व्याख्यान आयोजित केले आहे. ज्येष्ठ राजकीय विचारवंत व विश्लेषक प्रा. डॉ. प्रकाश पवार ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव : समकालीन संदर्भ’ या विषयावर बोलणार आहेत. बुधवारी (ता. ११) सायंकाळी सहा वाजता समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात व्याख्यान होणार आहे. तरी शहर व परिसरातील नागरिकांनी व्याख्यानाला उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
- - - - - -
शहापूर हायस्कूलचे यश
इचलकरंजी : छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दीनिमित्त आयोजित तालुकास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत शहापूर हायस्कूलने यश मिळवले. अर्पिता कांबळे, अदिती माने, हर्षदा मेथे या गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. कथाकथन स्पर्धेत दीपिका पाटील हिने तृतीय क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांना ए. जी. खटावकर, बी. पी. निकम, एस. एस. भोसले, एम. के. सुतार, आर. ए. सुतार, पी. पी. संकपाळ, मुख्याध्यापक एच. आर. कांबळे आदींचे मार्गदर्शन लाभले.
- - - -
रवींद्रनाथ टागोर यांना अभिवादन
इचलकरंजी : येथील नगरपरिषदेतर्फे राष्ट्रपुरुष गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना अभिवादन केले. प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांच्याहस्ते आणि माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बावचकर यांनी रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्यातील योगदान व राष्ट्रगीताच्या लिखाणामागील प्रेरणा याचा उल्लेख करून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. ग्रंथपाल सौ. बेबी नदाफ, मोहन कुंभार, बाबू पनोरी, प्रमोद नेजे, ओंकार आवळकर उपस्थित होते.
- - - - - - - - - - -
योग प्राणायाम शिबिर
इचलकरंजी : केमिस्ट असोसिएशन, पतंजली योग समिती, दि मॉडर्न हायस्कूल यांच्या विद्यमाने मोफत योग प्राणायाम शिबिर आयोजित केले आहे. ते मंगळवारी (ता. १०) ते रविवारी (ता. १५ ) पहाटे ५ ते ७ या वेळेत मॉडर्न हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. शिबिरात योगविज्ञान व आरोग्य शिबिर, आरोग्यविषयी व्याख्याने होणार आहेत. शिबिरात पांडुरंग चव्हाण (पलूस), नवनाथ पाटील (राधानगरी), चंद्रशेखर खापणे (राज्य प्रभारी) व श्वेता गावडे (सिंधुदुर्ग) हे तज्ज्ञ योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायम, आहार व योग्य प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पतंजली योग समितीचे कोल्हापूर जिल्हा प्रभारी विजय पोवार यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02122 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..