
तारदाळ खून
फोटो - दादासो निगडे
- - - - - -
3453, 03454
फोटो ओळ - तारदाळ : गावात पोलिसांनी मोठ्या फोजफाट्यासह कडक बंदोबस्त ठेवला आहे.
तारदाळच्या तरुणाचा
मित्रांकडून निर्घृण खून
तिघे ताब्यात;
तारदाळ ता. ९ : येथील गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मित्रांनी निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महादेव ऊर्फ दादासाहेब किसन निगडे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. आंबा घाटात हा खून झाल्याची घटना देवरुख पोलिसांच्या निदर्शनास आली. या प्रकरणी सूरज मेहबूब चिकोडे (वय २५) गणेश राजेंद्र शिवारे (३०) प्रतीक बापूसाहेब कोळी (१७, सर्व रा. तारदाळ) या तिघा संशयितांना रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने तारदाळातून ताब्यात घेतले आहे.
काही दिवसांपूर्वी हातकणंगलेतील बेपत्ता वखार व्यापाऱ्याचे अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असताना पुन्हा बेपत्ता तरुणाचा खून केल्याचे उघड झाले आहे. यामुळे हातकणंगले तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान आज सायंकाळी पोलिसांचा फौजफाटा गावात आला. संशयित सूरज चिकोडे याच्या घरावर नातेवाईक व ग्रामस्थांनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लाठीमार करत जमाव पांगविला. यामुळे गावात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, दादासाहेब निगडे हा १६ एप्रिल देव दर्शनासाठी घरातून निघून गेला होता. तो परत न आल्याने त्याच्या आईने शहापूर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी दादासाहेब याची पत्नी सौ. रेश्मा निगडे हीदेखील बेपत्ता असल्याची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली होती. मात्र, नंतर ती परतली. दरम्यान रविवारी (ता. ८) रात्री रत्नागिरी गुन्हे शोध पथकाने संशयित सूरज चिकोडे यासह तिघांना गावातून ताब्यात घेतले. काही काळातच निगडे या युवकाचा खून झाल्याची गावभर पसरली. नातेवाईकांनी देवरुख पोलिसांशी संपर्क साधला असता मृत दादासाहेब निगडे यांच्या कपड्यावरून मृताची ओळख पटली.
दादासाहेब निगडे याच्या मोबाईल लोकेशन, कॉल रेकार्ड यावरून देवरूख पोलिसांनी तपास गतिमान करत खुनाचा उलगडा केला. दादासाहेब यांचे नातेवाईक हे देवरुखहून घराकडे येताच गावामध्ये नागरिकांनी गर्दी केली. नागरिकांनी संशयितांच्या घरावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. या भीषण घटनेमुळे मुख्य शिवाजी चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी पोलिसांनी मोठा फौजफाट्यासह कडक बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस उपाधीक्षक बी. बी. महामुनी, पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार, अभिजित पाटील आदींनी घटनास्थळी भेट दिली. नातेवाईक, नागरिकांची समजूत काढत मारेकरी यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपास गतिमान करण्याचे आश्वासन दिले.
- - - - - - - - - -
चौकट
संशयित रावण गँगचा म्होरक्या
खुनातील मुख्य संशयित सूरज चिकोडे याची पानपट्टी असून त्याने अवैध धंद्यात बस्तान बसवले आहे. सूरज हा दोन वर्षांपूर्वी रावण गँगचा म्होरक्या होता. गावात सूरजची रावण गँगच्या नावाखाली दहशत आहे.
- - - - - - - -
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02131 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..