लायन्स निवडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लायन्स निवडी
लायन्स निवडी

लायन्स निवडी

sakal_logo
By

20786

लायन्स इचलकरंजी अध्यक्षपदी बालर
इचलकरंजी : लायन्स क्लब इचलकरंजीच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर यांची निवड केली. सचिवपदी सुभाष तोष्णीवाल, खजिनदारपदी संदीप सुतार यांची निवड झाली. क्लबचे प्रशासक म्हणून विजयकुमार राठी हे काम पाहणार आहेत. ही निवड २०२२-२३ या वर्षासाठी आहे. लक्ष्मीकांत भट्टड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्लबच्या बैठकीत कमिटी चेअरमन गजानन होगाडे यांनी निवडीतील सदस्यांची नावे जाहीर केली. त्यास सभासदांनी मान्यता दिली. महेश सारडा, विजयकुमार राठी, डॉ. विलास शहा, विजयराज जाजू, भरत भंडारी, लिंगराज कित्तुरे, सुरेश पाटील, कृष्णा भराडिया, मनोज सोमाणी, सौ. कनकश्री भट्टड, सौ.स्वाती राठी, सौ.महादेवी कित्तुरे आदी उपस्थित होते.
- - - - - - -

20787
20788
श्रावणी, समीक्षाची निवड
इचलकरंजी : श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या श्रावणी रवंदे व समीक्षा मिठारी यांची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी निवड झाली आहे. १४ वर्षाखालील गटात नागपूर येथे या स्पर्धा होणार आहेत. निवडीबद्दल प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन हरीष बोहरा , व्हाईस चेअरमन उदयजी लोखंडे, राजगोपालजी डाळ्या बाबासाहेब वडींगे यांच्याहस्ते दोघींचा सत्कार केला. खेळाडूंना मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर, उपप्राचार्य आर. एस. पाटील, उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. भस्मे, क्रीडा विभाग प्रमुख शेखर शहा, एस. के. लाड आदींचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02132 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top