इचलकरंजीत रंगमंचीय कला प्रशिक्षण शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत रंगमंचीय कला प्रशिक्षण शिबीर
इचलकरंजीत रंगमंचीय कला प्रशिक्षण शिबीर

इचलकरंजीत रंगमंचीय कला प्रशिक्षण शिबीर

sakal_logo
By

03457

-------------
कलेद्वारे देशाचा नावलौकिक वाढवा
अरूण खंजिरे; नाईट कॉलेजमध्ये रंगमंचीय कला प्रशिक्षण शिबीर
इचलकरंजी,ता.१० : विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत सुप्त गुणांचा विकास करून कलेला अमरत्वाकडे घेऊन जावे. कला ही अमर असते. त्याचा उपयोग करून देशाचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण खंजिरे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पुरंदर नारे होते.
नाईट कॉलेज येथे आयोजीत रंगमंचीय कला प्रशिक्षण शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नाईट कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना, भाषा विभाग, रोटरी क्लब एक्झिक्युटिव्ह रंगयात्रा नाट्यसंस्था, तुळजाराम सराफ, के. डी. म्युझिक अॅड रेकॉर्डिंग स्टुडिओ, योगेश्वरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. अरुण चौगुले, गिरीश कुलकर्णी, अतुल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रथम सत्रात ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मिलिंद दांडेकर यांनी नेटक्या अभिनयाने डोळे, चेहरा, हावभाव, संवादफेक कशी करावी हे गीत, संगीत, नाटक, चित्रपटातील विविध प्रसंगाद्वारे अभिनयाचे सादरीकरण केले. प्रसिद्ध सूत्रसंचालक मनीष आपटे यांनी संवाद, आवाजाची तीव्रता, साद, प्रतिसाद यांचा परिचय करून दिला. कलाकाराचा आवाज आत्मा असतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या लकबी, सवयी, आवाज, हावभाव, संवाद याचा सुक्ष्मपणे अभ्यास करावा म्हणजे आपला अभिनय समृद्ध होतो, असे मत श्री. आपटे यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट केदार कुलकर्णी यांनी आवाजाची किमया अनेक प्रसंगातून प्रात्यक्षिकासह करून प्रशिक्षणार्थीना प्रोत्साहन दिले.
दुसऱ्या सत्रात गायक, संगीत व कलाकार अनिल लोकरे यांनी संगीत, गाणी, गाण्यातील भाव, अर्थ व व्याकरण समजावून सांगितले. स्वरज्ञान, गाण्यातील आशय व अभिव्यक्तीसह लोकरे यांनी सादरीकरण केले. रंगकर्मी संतोष आबाळे यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी विविध गप्पा-गोष्टी, खेळ, लघुनाटिकांमधील प्रसंग सांगून गटचर्चाद्वारे त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांचा विकासाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी नऊ लघु नाटिकांचे सादरीकरण केले. परीक्षणानंतर त्यातील गुणदोषाविषयी माहिती दिली.
समारोप सत्राला इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणार्थीनींना प्रमाणपत्रांचे वाटप केले. शिबिरात शहर व परिसरातील विविध विद्यालय, महाविद्यालयासह सांगली, मिरज, शिरवाड, कोल्हापूर आदी ठिकाणाहून ११५ विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. माधव मुंडकर, प्रा. राज पटेल, प्रा. डॉ. आर. व्ही. सपकाळ, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. एम. एन. सय्यद, डॉ. सबिहा सय्यद, प्रा. कपिल पिसे, डॉ. विठ्ठल नाईक आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02133 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top