
पूरपरिस्थिती नियोजनाबाबत सज्ज रहा
20817
आपत्तीशी दोन हात करण्यास होमगार्ड सज्ज
डॉ.रश्मी करंदीकर ; इचलकरंजीत होमगार्डचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर
इचलकरंजी, ता.१० : पोलिस दलात होमगार्ड म्हणून आपण केवळ काम न करता समाजोपयोगी कामे करण्याची गरज आहे. पावसाळा तोंडावर असून पूरपरिस्थिती नियोजनाबाबत सज्ज राहिले पाहिजे, एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ‘एनडीआरएफ'' व ‘एमआरडीएफ'' पथकाला पाचारण करतो. मात्र त्याच क्षमतेचे प्रशिक्षण होमगार्ड यांना मिळाल्याने प्रत्येक होमगार्ड परिसरात आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी दक्ष राहणार आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ.रश्मी करंदीकर यांनी सांगितले.
येथील राजीव गांधी भवन येथे जिल्ह्यातील होमगार्डच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. होमगार्डना नेहमीपेक्षा वेगळे काही तरी शिकायला मिळत आहे. त्याचा वापर करून घ्या. यामुळे निर्णय क्षमतेला गती येणार असून आपत्कालीन परिस्थितीत बिनचूक उपायोजना पाहायला मिळतील, असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. अप्पर पोलिस अधीक्षक तथा जिल्हा होमगार्ड समादेशक जयश्री गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. पोलिस उपाधीक्षक बी.बी.महामुनी, पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार, महादेव वाघमोडे, राज्य आपत्ती प्रतिसाद धुळे पथकाचे पोलिस उपनिरीक्षक श्री. जगताप यांची उपस्थिती होती.
काही वर्षांपासून जिल्ह्यात चक्रीवादळ, अतिवृष्टी पूरपरिस्थित, भूस्खलन आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होत आहे. अशा वेगवेगळ्या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी शासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाची पथके येतात. मात्र वेळेत मदत मिळत नसल्याने जीवित व वित्तहानी होते. भविष्यात अशा स्वरूपाची आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास होमगार्डच्या माध्यमातून अशा परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी या जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन इचलकरंजीत केले आहे.
२०० हून अधिक होमगार्ड सहभागी
शहरातील सुमारे २०० हून अधिक होमगार्ड या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले आहेत. पाच दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात आपत्ती व्यवस्थापनातील प्रत्येक स्तराबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासह आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणाऱ्या प्रत्येक घटनांची प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत.अखेरच्या दिवशी होमगार्डची उजळणी, लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, अभिप्रायही घेतला जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02134 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..