नृत्याशी कधीच तडजोड केली नाही ः शर्वरी जमेनीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृत्याशी कधीच तडजोड केली नाही ः शर्वरी जमेनीस
नृत्याशी कधीच तडजोड केली नाही ः शर्वरी जमेनीस

नृत्याशी कधीच तडजोड केली नाही ः शर्वरी जमेनीस

sakal_logo
By

20855
-----
लोगो ः वसंत व्याख्यानमाला

नृत्याशी कधीच तडजोड केली नाही
शर्वरी जमेनीस; ‘संवाद कलाप्रवासाचा’मध्ये प्रकट मुलाखत
इचलकरंजी, ता. १० : चित्रपटातील कला तात्पुरते समाधान देवून जातात. तर शास्त्रीय संगीत आणि नृत्य चिरकाळ समाधान देते. माझे नृत्य हे पहिलं प्रेम आणि अभिनय दुसरे. नृत्याची सांगड घालून अभियानाला संधी दिली आहे. यामुळे कित्येक दैनंदिन मालिकांना नकार दिला आहे. आजतागायत कधीच नृत्याशी तडजोड केली नाही, असे सुप्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री शर्वरी जमेनीस (पुणे) यांनी सांगितले.
शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वसंत व्याख्यानमालेत अखेरचे पुष्प गुंफताना संवाद कलाप्रवासाचा यावर अभिनेत्री जमेनीस यांची प्रकट मुलाखत सौ. हर्षदा मराठे यांनी घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. स्वागत व प्रास्ताविक सौ. सुषमा दातार यांनी केले. मुकुंद फाटक, गिरीष कुलकर्णी, अनिल स्वामी, सौ. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जमेनीस म्हणाल्या, ‘माझा कलाप्रवास हा आईची स्वप्नपूर्ती आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून नृत्याचा प्रवास सुरू झाला. पंडीत डॉ. रोहिणी भाटे या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कलात्मक बांधणी मजबूत झाली. यातूनच नृत्य सोडणार नाही हे पक्के झाले. याच दूरदृष्टीतून कलाप्रवास सुखर झाला. कलात्मक आणि बुद्धिमत्ता यातून नेमकेपणाचे घडण्याचे बळ गुरुंमुळे कटाक्षाने जाणता आले. पुढे आठवड्यातून कमी वेळ देता येईल या हेतूने भटकंती नावाची मालिका केली. यामुळे गडकिल्ल्यांच्या आठवणी अनोख्यरितीने महाराष्ट्रासमोर उलघडल्या. भारतीय संगीत आणि नृत्याचा मूळ आत्मा सध्या हरवत चालला आहे. यामुळे आपण मुख्य गाभा विसरत आहोत. चेहरा, डोळे आणि शरीर यातून सांगणारे भाव आता दुर्मिळ होत आहे.’
शास्त्रीय नृत्यात प्रचंड संयम ठेवावा लागतो. ही असे आहे की रुजायला अनेक वर्षे लागतात. त्यानंतर नृत्याच्या शिक्षणातून स्वतःला घडवावे लागते. अनेक वर्षे या कलेत योगदान देण्याची इच्छा असेल तरच तरुणींनी या क्षेत्राचा विचार करावा. आर्थिक गणिते फार वेगळी असून मानसिक समाधान मोठे आहे. यातून मुळात समाधान शोधा, असे आवाहन नृत्यकलेत येणाऱ्या नवतरुणींना जमेनीस यांनी केले. त्यांनी संवाद साधता साधता नृत्यासह अभियनाचे अनेक किस्से सादर केले.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02135 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top