पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

कचरा टाकल्यावरुन
दोन कुटुंबांत हाणामारी
इचलकरंजी १० जण जखमी; परस्पर विरोधी तक्रारी, आठ जणांना अटक

इचलकरंजी, ता.१० : दारात कचरा टाकल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबांत हाणामारी झाली. लोखंडी रॉड, काठी, विटाने झालेल्या तुंबळ हाणामारीत १० जण जखमी झाले आहेत. यातील बालेखान पाथरवट आणि गुडुसाब मुल्ला या दोघांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून गावभाग पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. गावभागमधील कलावंत गल्लीत झालेल्या या हाणामारीनंतर मोठे तणावाचे वातावरण बनले होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील गावभाग राहणारे मुनीर पाथरवट यांच्या घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांत हाणामारी झाली.
यामत अल्लाबक्ष पाथरवट, आरीफ पाथरवट, आसिफ पाथरवट, रियाज पाथरवट यांनी मुनीर पाथरवट, अकबर पाथरवट, आसमा मुल्ला, रेश्मा पाथरवट, गुडुसाब मुल्ला, बालेखान पाथरवट आदींना लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण केली. याप्रकरणी अकबर पाथरवट यांनी अल्लाबक्ष, आरीफ, आसिफ, रियाज पाथरवट या चौघांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तर आरीफ पाथरवट याने दिलेल्या फिर्यादीत काठीने व विटाने झालेल्या मारहाणीत स्वत:सह अल्लाबक्ष, रियाज, आसिफ पाथरवट हे चौघे जखमी झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी मुनीर, अमीर, अकबर पाथरवट आणि आसमा मुल्ला या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02139 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top