
दुर्मिळ मांडूळची सुटका
03466
-----
मांडूळ साप पकडला
इचलकरंजीतील वन्यजीव संरक्षण संस्थेकडून वन विभागाकडे स्वाधीन
इचलकरंजी, ता. ११ : येथील जुना चंदूर रोडवरील पाटील मळा लोकवस्तीत दुर्मिळ मांडूळ जातीचा साप आढळला. याची माहिती त्वरित शहरातील वन्यजीव संरक्षण संस्थेला दिली. संस्थेचे सदस्य महेश सूर्यवंशी, रामन आमणे व सुहास जुवेकर यांनी सापाला पकडले. सुमारे तीन फूट लांबीच्या हा मांडूळ जातीचा साप वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांच्या स्वाधीन केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कोट्यवधींची किंमत असणाऱ्या या सापाची यामुळे तस्करीतून मुक्तता झाली. हा साप दुर्मिळ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या सापाची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. हा साप दुर्मिळ असल्यामुळे तो सहजासहजी मिळत नाही. दरम्यान, या सापाला सुरक्षित ठिकाणी सोडले. वनपाल राकी देसा यांच्या मदतीने तस्करांच्या तावडीतून या सापाला जीवदान देण्यात वन्यजीव संस्थेला यश आले आहे.
- - - - - - - - - - - - -
सापाबद्दल समाजात अंधश्रद्धा
मांडूळ जातीचा साप अतिदुर्मिळ असला तरी तो गुप्तधन आणि गुप्त वाट शोधून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका ठरवत असल्याचे समाजात म्हटले जाते. मात्र, असा कुठलाही प्रकार मांडूळ जातीच्या सापाकडून होत नाही, असे सर्पमित्रांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02140 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..