
भाजपतर्फे दत्तवाडला नदीपात्रात आंदोलन
03473
भाजपतर्फे दत्तवाडला
नदीपात्रात आंदोलन
इचलकरंजी ः दतवाड (ता. शिरोळ) येथे कोरड्या पडलेल्या दूधगंगा नदी पात्रात वाळत असलेली पिके व उस लावत भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दतवाडच्यावतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. दोन महिन्यात पाचव्यांदा दूधगंगा नदी कोरडी पडली आहे. पात्रातील पाणी संपून आठ दिवस झाले. यामुळे दत्तवाड परिसरातील नऊ गावच्या शेतकऱ्यांच्या शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने भाजपच्यावतीने आंदोलन केले. हे आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीत इचलकरंजीला दूधगंगा नदीपात्रातून एक थेंबही पाणी उचल करू देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. ॲड. सुरेश पाटील, राजगोंडा पाटील, सोमनाथ माने, तेजस वराळे, निलेश मोहिते, प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.
- - - - - - - --
बाळनाथ महाराज भंडारा सोहळा
इचलकरंजी : गावभागातील गुजरी पेठे येथे सद्गुरू बाळनाथ महाराज यांचा संजीवन समाधी भंडारा सोहळ्याचे आयोजन केले आहे. येथे बाळनाथ महाराजांची १३० वर्षे जुनी संजीवन समाधी आहे. गुरुवारी (ता. १२) सायंकाळी चार वाजता पालखी सोहळा व शहरातील मुख्य मार्गावरुन मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी (ता.१३ ) दुपारी बारा वाजता सद्गुरुंची आरती व नैवेद्य होवून महाप्रसाद वाटप होईल. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- - - - - - -
नृसिंह जयंती उत्सव
इचलकरंजी : गावभागातील लक्ष्मीनृसिंह उपासक मंडळाच्यावतीने नृसिंह जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. सोमवारपर्यंत (ता.१६) हा उत्सव चालणार आहे. गुरुवारी (ता.१२) श्रींचा पालखी सोहळा होणार आहे. सकाळी आठ वाजता सौ. स्मिता कुलकर्णी यांचे रामायणातील व्यक्ती दर्शन या विषयावर व्याख्यान होईल. शुक्रवारी (ता. १३) ह. भ. प. सोमनाथ लामकाने यांचे संतांच्या सहवासात या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. शनिवारी (ता. १४) ज्ञानदेवांची ओवी यावर ह. भ. प. बाळासाहेब धर्माधिकारी हे बोलणार आहेत. तसेच सायंकाळी पाच वाजता नरसिंह जयंतीनिमित्त ह. भ. प. ध्रुव पटवर्धन (सातारा ) यांचे कीर्तन होईल. रविवारी (ता.१५ ) सौ. हेमा चोपडा यांची सुखी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर व्याख्यान होईल. सोमवारी (ता. १६) श्रींच्या पालखी सोहळ्याने या उत्सवाची सांगता होणार आहे.
- - - - - - - - - - -
चंदूर रस्त्याची दूरवस्था
इचलकरंजी : येथील किसान चौक ते चंदुर रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करावे, या मागणीचे निवेदन आम्ही उद्योजक संघटनेने मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रदीप ठेंगल यांना दिले. किसान चौक ते चंदूर रस्त्यावर अनेक मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. इचलकरंजीस जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. राजू नदाफ, उमेश लाड, मोहन ढवळे, विशाल ढवळे, दीपक जाधव, अरुण म्हेत्रे, प्रशांत नेजे, राहुल मांडवकर आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02143 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..