
व्यंकटेश महाविद्यालयात ‘शेती अर्थशास्त्र’ वर वेबिनार
व्यंकटेश महाविद्यालयात ‘शेती अर्थशास्त्र’वर वेबिनार
इचलकरंजी, ता. १२ : ना. बा. एज्युकेशन सोसायटीच्या व्यंकटेश महाविद्यालयात अर्थशास्त्र मंडळातर्फे शेती अर्थशास्त्र व शेती उद्योग या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनार झाले. भारतातील कृषी आधारभूत अर्थव्यवस्था व शेतीउद्योग यावर आधारित वेबिनार ऑनलाईन पद्धतीने झाले. स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य प्रो. (डॉ.) एन. एम. मुजावर यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने होते.
प्रथम सत्रात शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रोफेसर व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. बी. जुगळे यांनी शेती अर्थशास्त्र व त्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेती, संधी, उत्पादकता आणि उत्पादनाचे अर्थशास्त्र, मूल्यवर्धन साखळीतील विपणन, फलोत्पादन निर्यात, वने उच्च कृषी तंत्रज्ञानातील आव्हाने आणि संधी, ड्रोन, हवामान बदल आणि माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, कृषी उद्यमशीलतेच्या यशोगाथा, गट गतिशीलता, सार्वजनिक धोरणांची भूमिका यावर चर्चा घडवून आणली.
दुसऱ्या सत्रात शेती आणि नैसर्गिक संसाधन अर्थशास्त्रज्ञ, नवी दिल्लीचे डॉ. परशराम पाटील यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात भारत व महाराष्ट्राच्या शेती उपयुक्ततेबाबत मार्गदर्शन केले. यासाठी असणाऱ्या योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. एम. एस. आंचलीया यांनी केले. अर्थशास्त्र मंडळाच्या प्रमुख डॉ. एस. आर. ठाकर यांनी आभार मानले. वेबिनार यशस्वी करण्यासाठी डॉ. डी. एस. कांबळे, डॉ. पी. आर. गायकवाड, सौ. एस. एस. कदम आदींनी परिश्रम घेतले.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02148 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..