मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक
मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक

मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक

sakal_logo
By

03487
इचलकरंजी : १) शहरातील बाजारपेठेत दिसेल तेथे विक्रीसाठी आंबेच आंबे दिसत आहेत.
03486
२) डोंगराची काळी मैना ठिकठिकाणी टोपलीतून विक्रीस येत आहे.
----
मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक
इचलकरंजीत पालेभाज्यांच्या दराचा भडका; खाद्यतेलाचे दर स्थिर
इचलकरंजी, ता. १२ : कोकण, कर्नाटकातील आंबा मोठ्या प्रमाणात शहरातील बाजारपेठेत दाखल होत आहे. त्यामुळे शहरात दिसेल तिथे विक्रीला आंबेच आंबे दिसत आहेत. केवळ १२० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यत डझनला भाव आला असून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत असल्याने खराब आंब्याना विक्रेत्यांना सामोरे जावे लागत आहे.
भाजीपाला बाजारात पालेभाज्यांचा भडका उडण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे फळभाज्यांचे दर दिलासादायक आहेत. कोथिंबीर, मेथीला अधिक भाव चढला आहे. कांदा, टोमॅटो आवक वाढतच आहे. फ्लॉवरची आवकही सर्वाधिक आहे. वांगी, दोडका, गवारीची आवक जेमतेम आहे. मिरचीची आवक सुधारल्याने दर आटोक्यात येत आहेत. हाताबाहेर गेलेले लिंबूचे दरात चांगलीच घट झाली आहे. फळबाजारात सफरचंदाची आवक कमी आहे. कलिंगड, टरबूजची चलती आहे. वाढते खाद्यतेलाचे दर स्थिर असून कमी होण्याची आशा ग्राहकांना आहे. फुलांचे दर सध्या थंड असून पुढील आठवड्यात मात्र लग्नाच्या एकापाठोपाठ मुहूर्तांमुळे भाव वाढण्याची शक्यता फूल विक्रेत्यांनी व्यक्त केली.
- - - - - - - - - -
प्रतिकिलो रुपये भाजीपाला : टोमॅटो- ३५ ते ४०, दोडका-३० ते ३५, वांगी- ४० ते ४५, कारली-३० ते ४०, ढोबळी मिरची- ३५ ते ४०, मिरची-३० ते ४०, फ्लॉवर-२५ ते ३०,कोबी-१० ते १५, बटाटा-२० ते २५, कांदा -१५ ते २०, लसूण-४० ते ५०, आले- ३० ते ३५, लिंबू- २०० ते ७०० शेकडा, गाजर- ५० ते ६०, बीन्स- ६० ते ८०, भेंडी- २० ते ३०, काकडी- २० ते ३०, गवार- ३० ते ४०, दुधी - २५ ते ३०, कोथिंबीर - २५ ते ३०, मेथी - २५ ते ३०, इतर पालेभाज्या १५ ते २० रुपये पेंढी.
- -
खाद्यतेल : शेंगतेल-१९० ते १९५, सरकी-१८० ते १८५, सोयाबीन-१७५ ते १८०, सुर्यफूल -२०५ ते २१०, पामतेल- -१७५ ते १८०.
- --
फुले ः केशरी व पिवळा झेंडू - ७० ते ८०, निशिगंध- १७०, गुलाब - १५० ते १८०, गलांडा-६० ते ८०.
- - - - - -
फळे : सफरचंद- १२० ते २५०, संत्री -१०० ते १५०, मोसंबी- १२० ते १४०, डाळिंब- १२०ते १५०, चिकू- ५०ते ६०, अंजीर- १४०-१६०, पेरु-६० ते १००, हनुमान फळ -१०० ते १२०, खजूर- १२०-१५०, पपई- ५० ते ६०, द्राक्षे - ६० ते १००, कलिंगड - २५ ते ३०, अननस ७० ते ८०, मोर आवळा - १०० ते १२०, केळी- ३० ते ४० डझन, देशी केळी ४० ते ५० डझन, स्ट्रॉबेरी, किवी ६० -७० (लहान बॉक्स), ड्रॅगन १००-१२०, परदेशी चिंच-१४०.
-- -
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २५, बार्शी शाळू- २५ ते ४०, गहू- २८ ते ३६, हरभराडाळ - ६० ते ६५, तुरडाळ- ८८ ते ९५, मुगडाळ- ९२ ते ९६, मसूरडाळ- ८६ ते ८८, उडीदडाळ-९० ते १००, हरभरा- ५० ते ५३, मूग- ८५ ते ९०, मटकी- १२० ते १३०, मसुर- ७७, फुटाणाडाळ- ७४, चवळी-८०, छोला - १००.


- - - - - - - - - - - -

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02150 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top