पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

धनादेश न वटल्याने
सात महिलांना तुरुंगवासाची शिक्षा

इचलकरंजी, ता.१२ : येथील श्रमशक्ती पतसंस्थेच्या कर्जाच्या वसुलीसाठी दिलेले धनादेश न वटल्याने सात महिलांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. तसेच त्यांना धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गीता बाळू आदमाने, मनीषा नीलेश टिळंगे, प्रमिला दादासो आदमाने, कविता विनोद आदमाने (सर्व यड्राव), सुमन गौतम कांबळे, दीपाली हौसेराव कांबळे, स्मिता सुभाष कांबळे (सर्व तळसंदे) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. येथील श्रमशक्ती कामगार नागरी सहकारी पतसंस्थेतून व्यवसायासाठी वरील सात महिलांनी कर्ज घेतले. या कर्जाच्या वसुलीसाठी त्यांनी पतसंस्थेला धनादेश दिले होते. संबंधितांच्या खात्यावर रक्कम नसल्याने धनादेश परत आले. त्यानंतर पतसंस्थेने सातत्याने कर्ज रक्कम भरण्याबाबत सूचना दिल्या. तरीदेखील महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पतसंस्थेने प्रथमवर्ग न्यायालयातील न्यायदंडाधिकारी यांच्याकडे त्यांच्याविरोधात दावा दाखल केला. दरम्यान, न्यायमूर्तींनीसुद्धा या प्रकरणात तडजोड करण्याची सूचना देऊनही याकडे कर्जदार महिलांनी दुर्लक्ष केले. पतसंस्थेच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करून न्यायमूर्ती प्रितेश भंडारी यांनी कर्जदार सभासद महिलांना दोषी ठरवले. सहा महिन्यांची साधी कैद, धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट रक्कम देण्याचे व रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्यास पुन्हा दोन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. संस्थेतर्फे ॲड. सुनील कुलकर्णी यांनी काम पाहिले.
- - - - - - -

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02152 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top