‘जलजीवन’ मधून रूईला पाच कोटी निधी ः सौ. मगदूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जलजीवन’ मधून रूईला पाच कोटी निधी ः सौ. मगदूम
‘जलजीवन’ मधून रूईला पाच कोटी निधी ः सौ. मगदूम

‘जलजीवन’ मधून रूईला पाच कोटी निधी ः सौ. मगदूम

sakal_logo
By

03505
-----
‘जलजीवन’ मधून रूईला
पाच कोटी निधी ः सौ. मगदूम
रुई, ता. १३ : रुईसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदे कडून ४ कोटी ९७ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वंदना मगदूम यांनी दिली.
भविष्यात गावातील पाणीपुरवठा नियमित सुरळीत व्हावा या हेतूने ही योजना महत्वाची ठरणार आहे. सहारानगर, धनगर माळ, माने नगर, राजमाने हायस्कूल परिसर तसेच वाढीव वस्ती भागासाठी सर्व भागात नवीन पाईपलाईन टाकणे, नदीपासून नवीन पाईपलाईन करणे, नवीन पाण्याची टाकी बांधणे, गावाला फिल्टरयुक्त पाणी देणे तसेच सर्वत्र पाईपलाईनला अत्याधुनिक पद्धतीचे व्हॉल्व बसवणे आदी बाबी या योजनेतून केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेकडून ४ कोटी ९७ लाख निधी मंजूर झाल्याचे सांगितले. निधीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, वंदना मगदूम, माजी सरपंच अभय काश्मीरे यांनी पाठपुरावा केला. सरपंच करिश्मा मुजावर, उपसरपंच युनूस मकानदार, ग्रामसेवक विठ्ठल कांबळे आदिंनी प्रयत्न केले.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02159 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top