
पान ३
03509
अब्दुललाट (शिरोळ) : येथे महसूल विभागाने बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त केले.
बेकायदेशीर वाळू वाहतुकीचे
तीन ट्रक अब्दुललाटमध्ये जप्त
अब्दुललाट, ता. १३ : येथील गाव सचिवालयासमोरून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त करण्यात आले. तीनही ट्रकमालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती तलाठी नितीन कांबळे यांनी दिली. तिन्ही ट्रक गुरुवारी (ता. १२) रात्रीच शिरोळ तहसील कार्यालयात नेण्यात आले.
महसूल विभागाने दिलेली माहिती अशी- गुरुवारी (ता. १२) रात्री साडेआठ वाजता गावातून वाळूने भरलेले तीन ट्रक जात असल्याचे निदर्शनास आले. हे समजताच तलाठी नितीन कांबळे, पोलिस पाटील मानसिंग भोसले, कोतवाल बाळू कोळी यांनी ट्रक थांबवले. यावेळी तिन्ही ट्रक वाळूने भरलेले आढळून आले. याची माहिती शिरोळ तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना देण्यात आली. त्या तत्काळ पोलिसांसह घटनास्थळी हजर झाल्या. हे तीनही ट्रक वाळूसह जप्त करण्यात आले. अब्दुललाट हे कर्नाटक सीमेवर असून नदीपात्रातून कर्नाटक राज्यात वाळूची वाहतूक होत असल्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02161 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..