
मनोरंजन व्याख्यानमाला
लोगो- मनोरंजन व्याख्यानमाला
-
03519
इचलकरंजी : मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत ‘आज या देशामध्ये’ हा कार्यक्रम सादर करताना चंद्रकांत काळे, विभावरी देशपांडे आणि गिरीश कुलकर्णी.
सामाजिक आशयाच्या कवितांनी रसिक मंत्रमुग्ध
इचलकरंजी, ता. १४ :‘‘चिमणीने कधीच दिला नाही स्वातंत्र्याचा लढा, तरीही अजून ती गुलाम नाही कुणाची’’ अशा प्रकारच्या विविध भारतीय भाषांमधील वास्तववादी आणि सामाजिक आशयाच्या कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते ‘आज या देशामध्ये’ या कवितांच्या आविष्कार सादरीकरणाचे. गायक अभिनेते चंद्रकांत काळे, विभावरी देशपांडे, गिरीश कुलकर्णी यांनी अभिवाचन आणि गायन केले.
मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आयोजित ४४ व्या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी शब्दवेध पुणे निर्मित हा कार्यक्रम सादर झाला. संहिता व दिग्दर्शन काळे यांचे आहे, तर संगीत दिग्दर्शन कै. आनंद मोडक यांचे होते.
मनोरंजन मंडळाचे माजी अध्यक्ष रमेश मर्दा, दीपक निंगुडगेकर-कुलकर्णी यांच्या हस्ते शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्यामसुंदर मर्दा यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. समन्वयक संजय होगाडे यांनी प्रास्ताविक केले. संतोष आबाळे यांनी परिचय करून दिला. विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, अरुण कोलटकर, बा. सी. मर्ढेकर यांच्यासह भारतीय भाषांमधील विष्णू खरे, अशोक वाजपेयी, वेरमुथु, नीलमणी फुकन, शक्ती चटोपाध्याय, के. जी. शंकरपिलाई, ए. के. रामानुजन, दिलीप झवेरी, मनेका शिवदासानी, अपर्णा मोहंती आदी प्रसिद्ध कवींच्या आशयघन कवितांची प्रखर मांडणी आपल्या अभिनयसंपन्न सादरीकरणातून केली.
सादर करण्यात आलेल्या
"गावी विठुच्या गेलो विठू दिसेनाच कुठं,
रखुमाईच्या शेजारी निसती सावळ्याची वीट,
अवचित आज माझ्या डोळ्यात अंधारून आलं,
अठ्ठावीस युगांचं हे एकलेपण उभं ठालं"
या अरुण कोलटकर यांच्या गीताने रसिकांची मने जिंकली. दीप्ती कुलकर्णी यांनी हार्मोनियम साथ तर अक्षय शेवडे यांनी ढोलक व तालवाद्य साथसंगत केली.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02167 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..