पोलीस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस वृत्त
पोलीस वृत्त

पोलीस वृत्त

sakal_logo
By

घरात घुसून नासधूस करीत
महिलेचा केला विनयभंग
इचलकरंजी : घरात घुसून वस्तूंची तोडफोड करत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे, शुभम वायचळ आणि शिवा (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) अशी त्यांची नावे आहे. तिघांनी पीडित महिला, तसेच त्याच्या पतीला मारहाणही केली. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली. संशयित तिघांनी पीडित महिलेला तुझ्या मुलाने आमचे चारचाकी वाहन फोडून मारहाण केली आहे. त्याला आम्ही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. घरातील वस्तूंची तोडफोड सुरू केली. तसेच महिलेचा विनयभंग करून पीडित महिला आणि तिच्या पतीलाही शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

आजरा-गडहिंग्लज मार्ग टस्कराने रोखला
आजरा ः येथील आजरा-गडहिंग्लज मार्गावर टस्कर रस्त्यावर आल्याने वाहनधारकांची धावपळ उडाली. सुमारे अर्धा तास तो रस्त्यावर वावरत असल्याने वाहतूक खोळंबली. आज सायंकाळी साडेपाच वाजता हा प्रकार घडला. हाजगोळी- पेद्रेवाडी परिसरात टस्कर वावरत आहे. त्याच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. आज सायंकाळी टस्कर अचानक आजरा गडहिंग्लज मार्गावर मसोबाजवळ रस्त्यावर आला. त्याच्या आगमनाने वाहतूक सुमारे अर्धातास खोळंबली होती. या मार्गावर रहदारी मोठी असते. आजहा रहदारी मोठी होती. टस्करामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. टस्कराला पाहण्यासाठी रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. काही वेळानंतर टस्कर पुन्हा जंगलाकडे निघून गेला.

इचलकरंजीत दोन मोबाईल चोरीस
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदी घाटावर पोहायला गेलेल्या दोघांचे मोबाईल चोरीस गेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये गिरीष कांदेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत १५ हजार रुपयांचा मोबाईल, तर अरविंद कापसे यांचा २५ हजार रुपयांचा, असे एकूण ४० हजार रुपयांचे २ मोबाईल चोरीस गेल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी संशयित दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02189 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top