इचलकरंजी पालिका नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी पालिका नोटीस
इचलकरंजी पालिका नोटीस

इचलकरंजी पालिका नोटीस

sakal_logo
By

इचलकरंजी पालिकेला
प्रदूषणप्रश्नी नोटीस
पंचगंगेतील शेकडो मासे मृत्युमुखी प्रकरण
इचलकरंजी, ता.१८ : शहरातील प्रदूषण रोखण्यात इचलकरंजी नगरपालिका अपयशी ठरल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला पुन्हा नोटीस बजावली आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध निर्देशांचे पालन न करता पंचगंगा नदीत सांडपाणी सोडणे आणि ४० एमएलडी क्षमतेचा एसटीपी प्रकल्प सुधारण्यास अयशस्वी झाल्याचा ठपका इचलकरंजी पालिकेवर ठेवण्यात आला. पुढील सात दिवसात पालिकेने यावर खुलासा नाही केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदुषणाबाबत नगरपालिकेला वारंवार जागे केले होते. तरीदेखील सुधारणा दिसली नसल्याने आणि काही दिवसांपासून नदी प्रदूषणाच्या भीषण घटना समोर आल्याने इचलकरंजी नगरपालिकेवर कारणे नोटीस दिली आहे.
शिरढोण (ता.शिरोळ) येथील कुरुंदवाड पुलावर प्रदूषित पाण्यामुळे चार दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली. यावेळी काळ्या रंगाचे सांडपाणी नदीच्या पाण्यात आढळून आले. शहरातील टाकवडे वेस पंपिंग स्टेशनला भेट दिली असता एकूण निर्माण होणारे घरगुती सांडपाणी पंचगंगा नदीत कोणत्याही प्रक्रियेशिवाय सोडत असल्याचे भीषण चित्र निदर्शनास आले. २० एमएलडी एसटीपी पूर्णपणे कार्यरत नसल्याचेही आढळले. याबाबतचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. आता पुढील सात दिवसात पालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाला खुलासा करावा लागणार आहे; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या नोटीसेमुळे पालिकेला चांगलाच दट्ट्या लागला असून येत्या काळात नदी प्रदूषणा बाबत पालिकेची प्रतिमा बदलावी लागेल.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02202 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top