एकात्मता, भेदभाविरहीत समाज रहावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकात्मता, भेदभाविरहीत समाज रहावा
एकात्मता, भेदभाविरहीत समाज रहावा

एकात्मता, भेदभाविरहीत समाज रहावा

sakal_logo
By

लोगो ः मनोरंजन व्याख्यानमाला
-----------------
03583

-------
एकात्मता, भेदभाविरहीत समाज रहावा
प्रा. इमारतवाले; ‘आदिलशाही व मराठा संबंध आणि छत्रपती शिवराय’ वर व्याख्यान
इचलकरंजी, ता. १९ : मराठा समाज आणि मुस्लिम समाज शेकडो वर्षे एकत्रित राहिला आहे. त्यामुळे दोन्ही संस्कृतीमधील अनेक गोष्टी एकमेकांनी स्वीकारलेल्या दिसतात. चांगले ते स्वीकारण्याची ही उदात्त सद्‍भावना आजही रहायला हवी. इतिहासातील चांगल्या गोष्टी घ्यायला हव्यात, तरच आपले वर्तमान, पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित आणि चांगले राहील. आज मध्यमवयीन असलेल्या पिढीसाठी नव्हे तर उद्याच्या पिढीच्या भल्यासाठी एकात्मता आणि भेदभाविरहीत समाज रहायला हवा, असे प्रतिपादन लेखक व इतिहास संशोधक प्रा. अब्दुल गणी इमारतवाले, (विजापूर) यांनी केले.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब सेंट्रलतर्फे आयोजित मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत सातव्या दिवशी आदिलशाही व मराठा संबंध आणि छत्रपती शिवराय'' या विषयावर ते बोलत होते. प्रा. प्रशांत कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. इमारतवाले म्हणाले, ‘शिवाजी महाराज हे खूप महान राजा होते. आपल्या जीवनात नेहमीच मानवता पाळणारे, जनहीत पाहणारे, स्त्रियांना सन्मान देणारे असा ते जाणता राजा होते. विचारांचा उदात्तपणा आणि मोठेपणा शिवाजी महाराजांकडे होता. एकात्मतेला महत्त्व देणारा उच्च दर्जाचा त्यांचा स्वभाव होता.’
आदिलशाही व मराठा साम्राज्य यांच्या संबंधाबद्दल बोलताना इमारतवाले यांनी, १४८९ ते १६८६ अशी जवळजवळ दोनशे वर्षे दक्षिण भारतात आदिलशाही होती. त्याकाळात आदिलशाही व मराठा साम्राज्य एकमेकास सहकार्य करीत होते. मराठी भाषा तसेच मराठी संस्कृतीमधील अनेक गोष्टींना आदिलशाहीत मान्यता मिळालेली होती.’ डॉ. इमारतवाले यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला इतिहासातील काही गोष्टींचा आढावा घेतला.