
हातगाडे फुटपाथवर, वाहने रस्त्यावर
03634, 03635
इचलकरंजी : भगतसिंग उद्यानासमोर खाद्यपदार्थांचे हातगाडे फुटपाथवर लागत नसल्याने वाहने रस्त्यावर पार्किंग होत आहे. दुसऱ्या छायाचित्रात उद्यानासमोर नो पार्किंग झोन मध्येही वाहने पार्किंग होताना दिसत आहेत.
हातगाडे फुटपाथवर, वाहने रस्त्यावर
इचलकरंजीतील प्रकार; वाहतुकीचा बोजवारा, वाहतूक शाखेची दमछाक
इचलकरंजी, ता. २४ : रस्त्यावरची वाहतूक कोंडी नको म्हणून भगतसिंग उद्यानासमोरील खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांना बागेत जागा दिली. मात्र आता हे हातगाडे पुन्हा बागेसमोर फुटपाथवर लागले आहेत. सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे बालचमूसह कुटुंबांची बागेत मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. यामुळे भगतसिंह उद्यानासमोर सायंकाळी पाच नंतर वाहतुकीचा बोजवारा उडत असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.या वाहतुकीला आवरता आवरता वाहतूक शाखेला आता घाम फुटू लागला आहे.
भगतसिंग उद्यानाचे रुपडे पालटताना उद्यानासमोरील खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांचीही सोय करून देण्यात आली. यामुळे सायंकाळनंतर उद्यानासमोर होणाररी वाहतूक कोंडी टळली आणि सुलभपणे हातगाडे उद्यानाच्या आतील बाजूस लागू लागले. तसेच बागेत येणार्यांची गैरसोय थांबून वाहतुक कोंडीच्या समस्याचा निपटारा झाला. मात्र आता हातगाड्यांनी पुन्हा उद्यानासमोरील फुटपाथवरील वाट धरली आहे. या फुटपाथवर सायंकाळनंतर हातगाड्यांची रांगच लागते. त्यामुळे पार्किंगचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.फुटपाथवर नेटके होणारे वाहनांचे पार्किंग पार्किंग आता बेशिस्तपणे रस्त्यावर होऊ लागले आहे.त्यामुळे वाहतुकीला अडथळा वाढला आहे.
भगतसिंग उद्याना समोरील हा रस्ता थोरात चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मुख्य मार्गाला जोडणारा आहे. तसेच थोरात चौकात आठवडा बाजार असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. तसेच मोठ्या प्रमाणावर वाहतूक असणारा हा मार्ग अवजड वाहतुकीसाठीही खुला असतो. मात्र सध्या सुरळीत वाहतुकीला अतिक्रमण झालेल्या फुटपाथवरील या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यामुळे बाधा पोहोचत आहे. या मार्गावरील वाहतुकीची शिस्त बिघडली आहे.
-----------------
चौकट
वाहतूक शाखेचे पालिकेला पत्र
वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भगतसिंग उद्यानासमोरील फुटपाथवरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी वाहतूक नियंत्रण शाखेने केली आहे. या मागणीचे लेखी पत्र पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना दिले आहे. या फुटपाथवरील अतिक्रमणावर कारवाई करावी, अशी मागणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02231 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..