
‘स्वाभिमानी’तर्फे महाआरोग्य शिबीर
03675
‘स्वाभिमानी’तर्फे महाआरोग्य शिबिर
इचलकरंजी : सामान्य जनतेला उत्तम प्रकारचे आरोग्य सुविधा देणे ही खूप महत्त्वाची बाब आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानीचा प्रत्येक कार्यकर्ता नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर व कटिबद्ध असेल, असा विश्वास माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित मोफत महाआरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
सिद्धिविनायक मंदिर, आसरानगर येथे शिबिर झाले. महाआरोग्य शिबिरात हृदयविकार, नेत्र विकार, मूत्रविकार, शुगर, जनरल तपासणी आदी सेवा नागरिकांना मोफत दिल्या. स्वाभिमानी युवक संघटना अध्यक्ष अभिषेक पाटील यांचा सत्कार श्री. शेट्टी यांनी केला. स्वागत व सूत्रसंचालन आण्णासाहेब शहापुरे यांनी केले. गणेश बागडे यांनी आभार मानले. बसगोंडा बिरादार, आण्णासाहेब शहापुरे, सतीश मगदूम, विष्णू साळुंखे, संजय बेडक्याळे, महंमद मुजावर, गणेश बागडे, रामचंद्र शेळके, वीरकुमार हुपरे, अर्जुन बागडे, बाळासो पाटील आदी उपस्थित होते.
- - - - - - -
03674
नाईट कॉलेजच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
इचलकरंजी : येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे संस्थेच्या नाईट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी औद्योगिक भेट दिली. बीकॉम भाग ३ मधील विद्यार्थ्यांनी विकासनगर येथील सायझिंग व्यवसायास भेट देऊन माहिती घेतली. अभ्यास भेटीत ५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. कापड व्यवसायातील यंत्रसामग्री उभारणी, देखभाल, व्यवसायाची आवश्यकता, कच्चामाल, व्यवसायाचे व्यवस्थापन आदी विषयांची माहिती मिळाली. अभ्यास भेटीचे आयोजन वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. सौ. पौडमल यांनी केले. उद्योजक सुनील मराठे यांचे अभ्यास भेटीसाठी सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. पी. डी. नारे यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक अभ्यास भेट झाली.
- - - - - - - - - - - -
नेत्र तपासणी शिबिर
इचलकरंजी : बैतूमुल्ला कमिटी व आरबाज-शहाबाज खतीब युवा मंच यांच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद लाभला. शिबिराला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव शशांक बावकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राहुल खंजिरे, समीर जमादार, दिलीप पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात नेत्र तपासणीसह मार्गदर्शन केले. शिबिरासाठी ताजुद्दिन खतीब, आरबाजी खतीब, शहाबाज खतीब, जावेद खतीब, आफताब शेख, मुजम्मील मुजावर आदींनी परिश्रम घेतले.
- - - - - - - -
जांभळीत कथा सप्ताह
इचलकरंजी : जांभळी (ता. शिरोळ) येथे श्रीमद्भागवत कथा सप्ताहाचे आयोजन केले आहे. कथाकार डॉ. विकासानंद मिसाळ महाराज यांच्या मधूर वाणीतून कथा सप्ताह होणार आहे. मंगळवार (ता. ३१) ते ७ जूनदरम्यान कथा सप्ताह होणार आहे. दररोज सायंकाळी सहा ते अकरा या वेळेत जांभळी क्रीडा मंडळ येथे हा कथा सप्ताह होईल. समस्त वारकरी मंडळ, गावातील तरुण मंडळे आणि सत्संग सेवा समिती, सुदर्शन योग आश्रमतर्फे आयोजित सप्ताहाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.
- - - - -- - - - -
ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन
इचलकरंजी : रोटरी क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे. प्रोबस क्लब, प्रोबस महिला क्लब, प्रोबस ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने हे स्नेहसंमेलन श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात ५ जूनला होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होईल. प्रथमेश दाते, मंगलाताई शहा यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, रोटरीचे प्रांतपाल गौरीष धोंड, सहायक प्रांतपाल नागनाथ बसुदे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विवेक घळसासी (सोलापूर), प्रा. मारुती यादव (पुणे), प्रा. ए. एम. गुरव यांचे मार्गदर्शन होणार आहे.
- - - - - -
मातंग समाजाचे उपोषण मागे
इचलकरंजी : यड्राव (ता. शिरोळ) येथील विविध विकासकामांच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीसमोर सुरू असलेले मातंग समाजाचे उपोषण मागे घेण्यात आले. लोकप्रतिनिधींची शिष्टाई व ग्रामविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. उपोषणस्थळी महिलांचा लक्षणीय सहभाग होता. येथील मातंग समाजातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व गटार बांधकामाबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती; मात्र ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. सरपंच कुणालसिंह निंबाळकर, सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर, शहापूरचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील आदी उपस्थित होते.
- - - - - - - -
3676
बिंदगेंचा वाढदिवस विविध उपक्रमांनी
इचलकरंजी : दक्षिण भारत जैन सभेच्या दिगंबर जैन बोर्डिंगचे संचालक चंद्रकांत बिंदगे यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम राबवले. बोर्डिंग परिसरात वृक्षारोपण केले. तसेच रक्तदान शिबिर आणि अन्नदान झाले. रवींद्र पाटील, सचिवकुमार बोरगावे, संजय कोले, संतोष पाटील, शीतल खंजीरे, विजय तेरदाळे साहेब, दिनेश छाजेड, शहाजी राणे, सुनील पाटील, सुधाकर जाधव, प्रमोद चराटे, सौरभ हाळे, शार्दूल बिंदगे, अमर कारंडे, मोहन चौगुले, भरत चौगुले, शेखर स्वामी, बोर्डिंग पर्यवेक्षक पार्श्वनाथ पाटील, संतोष शिंदे, कौस्तुभ लवटे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02251 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..