रिसेन्ट ऍडव्हान्सेस इन मॅथेमॅटिकस -२०२२ वर संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिसेन्ट ऍडव्हान्सेस इन मॅथेमॅटिकस -२०२२ वर संमेलन
रिसेन्ट ऍडव्हान्सेस इन मॅथेमॅटिकस -२०२२ वर संमेलन

रिसेन्ट ऍडव्हान्सेस इन मॅथेमॅटिकस -२०२२ वर संमेलन

sakal_logo
By

रिसेन्ट ॲडव्हान्सेस इन
मॅथॅमॅटिकस -२०२२ वर संमेलन
इचलकरंजी, ता.२९ : दत्ताजीराव कदम आर्टस् , सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयात रिसेन्ट ॲडव्हान्सेस इन मॅथॅमॅटिक्स -२०२२ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय संमेलन झाले.
वरिष्ठ गणित विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे आयोजित राष्ट्रीय संमेलनाचे उद्‍घाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसंचालक (प्रशासक ) डॉ. आर. व्ही. शेजवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. शिवाजी विद्यापीठाच्या गणित विभागप्रमुख डॉ. सरिता ठक्कर या बीजभाषिक म्हणून उपस्थित होत्या. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या संमेलनात विविध राज्यांतील सहभागी शिक्षक, संशोधक विद्यार्थ्यांनी १२ संशोधन पत्राचे सादरीकरण केले.
प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी स्वागत केले. डॉ. सागर सुतार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सरिता ठक्कर, डॉ. व्ही. दानूमजाया (बिर्ला इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोवा), डॉ. किशोर कुचे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), डॉ. सचिन भालेकर (हैदराबाद युनिव्हर्सिटी) यांनी संमेलनात मार्गदर्शन केले. संशोधन पत्रिका सादरीकरण सत्राचे काम डॉ. एम. टी. गोफणे यांनी पहिले. सांगता समारंभासाठी शिवाजी विद्यापीठाचे डॉ. एम. टी. गोफणे हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर प्राचार्य डॉ. ढेकळे अध्यक्षस्थानी होते. सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अतिश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. गणित विभागप्रमुख प्रा. डी. जे. मुंगारे व डॉ. विनायक गाणबावले यांनी आभार मानले. डॉ. दीपक कुंभार यांचे तांत्रिक साहाय्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02252 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top